कामाच्या दर्जाबाबत निर्माण होत आहे साशंकता
गोविंद पाटील/प्रतिनिधी
उस्मानाबाद ते उजनी राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून संथ गतीने सुरू होते. याच दौरान कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आधीच संथ गतीने सुरू असलेले राज्यमार्गाचे काम पुर्णता ठप्प झाले आहे. उस्मानाबाद-बेंबळी-उजनी जोडणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला तीन फुटापर्यंत खोदकाम करून त्यामध्ये मरुम भरला आहे. हे काम टप्प्या-टप्यात अशा पध्दतीने करण्यात येत आहे. त्यातच रविवार व सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे रस्त्याचे रूपांतर घसरगुंडीत झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करने धोकादायक बनले आहे. तसेच येथे रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना होण्याची संभावना वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर एका साईडवर टाकलेली खडी दुसऱ्या साईडवर आल्याने व येथे निर्माण झालेल्या खड्डयामुळे तसेच चिखलामुळे येथील प्रवास खडतर बनला आहे. याच रस्त्यावर होत असलेली घसरगुंडीमुळे टु-व्हिलरधारकांसोबत अन्य वाहन चालकांना जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी खडतर प्रवास करावा लागत आहे.
उस्मानाबादपासून बेंबळी मार्गे जिल्हयाची हद्द असलेल्या उजनी पार्टीपर्यंत अॅन्युईटी योजनेतंर्गत रस्ता रूंंदीकरणाचे काम मोठया ढिलाई होत होते. परंतु सध्य परिस्थित हे काम ठप्प आहे. या कामासाठी सुमारे १०४ कोटी रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयापासूनच्या कामाचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना, वाहन चालकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. मध्यंदतरीच्या काळात उस्मानाबाद ते उजनी राज्यमार्गाचे काम कंत्राटदाराकडे यंत्रणाच नसल्याने ठप्प झाले होते. या मार्गावर काम होत असताना मुख्य डांबरी रस्त्याला पोखरून तेथे उंची वाढवण्यासाठी मुरूम टाकण्यात आला आहे. कांही ठिकाणी डस्टही टाकण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदाराकडून पुढील काम करण्यात दिरंगाई झाल्याने व या कंत्राटदाराकडे यंत्रणाच नसल्यामुळे हे काम संथ गतीने होऊन आता ते चक्क ठप्प झाले आहे. कोणताही शासकीय स्तरावरील व्यक्ती या कामावर हजर नसतो त्यात प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत आहे. सध्या यंत्रणा नसल्यामुळे पुर्णता काम ठप्प आहे. यामुळे नियमानुसार कंत्राटदाराला दंड आकारण्याची गरज आहे. तसेच कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिस कर्मचाऱ्याने बुजविले खड्डे
उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता पाटी परिसरात पडलेले जीव घेणे खड्डे हे स्वत: बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक कपाळे यांनी कांही युवकांना सोबत घेऊन बुजवले. त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे.