बहुजन हिताय । बहुजन सुखाय ।। या संताच्या उक्तीप्रमाणे स्वतःपेक्षा समासहित व समाजसुखाचा विचार करून आपले जीवन व्यतीत करणाऱ्या अनेक महनीय व्यक्ती मराठवाड्यात व महाराष्ट्रात होवून गेल्या. आजही आहेत, आशा व्यक्तीच समाजाचे वैभव असतात अाशा मराठवाड्यातील थोर व्यक्तीपैकी माननीय तात्यासाहेब एक आहेत.
न्यायमूर्ती बी. एन. देशमुख उपाख्य तात्यासाहेब यांचा प्रवास समाजकारण,राजकारण, विधी व न्याय अशा विविध पातळ्यावर झाला. तात्यासाहेबांचे शिक्षण उस्मानाबाद, सोलापूर व उच्च शिक्षण पुणे येथे झाले ते पुढे अंतरराष्ट्रीय कायद्याचा आभ्यास करण्यासाठी इंग्लंड मधील प्राख्यात विद्यापिठात दाखल झाले. त्याकाळात परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अतिशय कमी होती, पण साहेबांनी ‘बार-अॅट-लॉ,ही अंतरराष्ट्रीय कायद्याची पदवी गुणवत्ता पूर्ण वर्गात उत्तीर्ण होवून संपादन केली. व ते भारतात आपल्या मायदेशी परत आले.
देश आता कुठे स्वतंत्र होवून १० - १५ वर्ष होत आली होती. महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा विलीन झाला होता. मराठवाडा त्यापूर्वी निजामाच्या गुलामगिरीत होता. स्वातंत्रउत्तर काळात व स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक, राजकिय क्षेतात झोकून देऊन सामाजिक प्रगतीसाठी काम करणारे नेते होते. उस्मानाबाद मधील आदरणीय नररिंगराव देशमुख काटीकर व भाई उध्दवराव पाटील हे त्यांच्या पैकीच होत. देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र जनतेच्या हितासाठी, त्यांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी ही धारणा ठेवून सामाजिक जिवनात काम करणारे, परंतु स्वातंच्या नंतर मत गरीबांची व सत्ता श्रीमंताची ही राजकीय अवस्था होवू नये म्हणून महाराष्ट्रातील नामंवत बहुजनवादी नेत्यांनी एका व्यापक विचार सरणीतून शेतकरी कामगार पक्षाची, स्थापना केली. पक्ष स्थापनेचा उद्देश ‘आता स्वातंत्र्य आले, समला कधी येणार? असा होता. समता प्रस्थापीत करण्यासाठी राज्यककर्त्याच्या मनात गरीबा बद्दल ममता असावी लागते, नसता सगतेसाठी गरीबांना संघर्ष करावा लागतो. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर महाराष्ट्रातील व देशातील भले-भले सत्तेच्या दिंडीत सामील झाले. परंतू या स्वातंत्र्याचा उपयोग शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी व समाजातील वर्बलघटाकाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे. या समाज घटकांना विकास प्रक्रियेत आणले पाहीजे, या व्यापक राजकीय उद्दीष्ठांनी नरसिंगराव देशमुख व भाई उध्दवराव पाटील, तसेच त्यांचे सहकारी व त्यांचे समक्ष नेते महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण करीत होते. त्याच वेळी तात्यासाहेब कायद्याची उच्च पदवी संपादन करून भारतात परतले होते. त्यांचे वडिल आदरणीय नरसिंगराव देशमुख व मामा भाई उध्दवराव पाटील यांच्या शेका  पक्षाच्या विचाराच्या तात्यासाहेबांवर प्रभाव न पडला  तर नवल!
तसे तर पुणे येथे तात्यासाहेब विज्ञान शाखेची पदवी घेत असताना पुणे येथील मराठवाडा, मित्र मंडळात ते पदाधिकारी असताना अनेक मान्यवर नेत्यांची अभ्यासू भाषणे  घेवुन, तरूणांना विचार মप्रवण बनवत होते. त्यांच्यामध्ये परिवर्तनशील विचारंचे स्फुलींग पेटवत होते. पुढ इंग्लंडला पढील शिणासाठी गेल्यानंतर तिथे अनेक राजकीय व समाजिक उपक्रमात भाग घेवून आपल्यावरील डाव्या विचाराचा प्रभाच असल्याचे दाखवून दिले होते. याच काळात त्यांचे मामा माई उध्दवराव पाटील हे महाराष्ट्र पातळीवरचे अग्रगण्य नेते होते व नरसिंगराव देशमुख जिल्हयातील नामवंत विधिज्ञ  होते. वरील दोन्ही नेते आपण स्वीकारलेल्या राजकीय विचाराप्रमाणे काम करीत असताना मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहीजे, गुजरातला कधीच नाही. या व इतर राजकीय विचाराप्रमाणे  प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचे  उग्र लढे महाराष्ट्रात देत असताना नरसिंगरावजी दादांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची जमिनी सोडविण्यासाठी त्यांचे विनामूल्य वकिलपत्र घेवून असंख्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत होते. म्हणून परदेशातून परत आल्यावर मुंबई हायकोर्टात वकिली व्यावसाय करून अफाट पैसा मिळविणे व त्या क्षेत्रातील लौकिक प्राप्त करणे, त्यांना सहज शक्य होते. परंतू व्यक्तीगत जिवन सुखी संपन्न करण्यापेक्षा बहूत्यांच्या हिताचे, बहुतांच्या सुखाचे हे राजकिस जिवनाचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी वकिली व्यावसाया बरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या, चळवळीच्या व डाव्या राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचे ठरविले.
पक्षाचे विचार तरूणापर्यंत पोचले पाहिजेत व तरूणा मधून पुरोगामी डाव्या विचाराचे अधिष्ठान ठेवून उदयाचे लढाउ कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. यासाठी त्यांनी ‘पुरोगामी विद्यार्थी युवक संघटनेची महाराष्ट्र पातळीवर स्थापना केली. व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तसेच शेतकरी मजुरांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करून, वैधानीक चळवळी उभारून संबंधीतांचे प्रश्न ऐरणीवर आणले. उदा.विद्यार्थ्याची  फि विरोधी अंदोलने, तसेच विद्यापिठ क्षेत्रातील ग्रामिण विद्यार्थ्याची निवासाची सोय शहरातच करण्यासाठी शासनाने किंवा विद्यापिठाने पुढाकार घ्यावा व  निवासाची सोय शहरातच करावी, तसेच अनेक शैक्षणीक प्रश्नावर व ग्रामीण भागातील राजकीय समस्यावर चळवळी उभारून सत्तेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधून, त्या समस्या सोडविण्यास शासनास भाग पाडले..
सन १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमीचे कामे सुरू करण्यासाठी व मजूराचे प्रश्न सोडचिण्यासाठी आंदोलने केली. या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात  शासन देशात पहील्यांदा रोजगार हमी कायदा केला व पुढे संपूर्ण देशात तो कायदा लागू झाला, तात्यासाहेबांनी शेकापच्या वतीने सन १९७८ साली विधान सभेची निवडणूक लढवली. त्यापूर्वी ते लोकसभेचे उमेदवार म्हणून शेकापच्या वतीने लढ़ले होते. पण दुर्दैवाने या निवडणुकात निसटता पराभव स्वीकारावा  लागला परंतू पराभवाने खचून न  जाता वैचारिक राजकारणाची धार लोक चळवळीच्या मध्यमातून वाढवत राहिले.
आपला वकिली व्यवसाय करीत असताना सामाजिक न्यायालयीन प्रकरणे तसेच गरीब पक्षकार व पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकटून फी ची अपेक्षा कधीच केली नाही. माझी वकिली संबंधितांना न्याय मिळून देण्यासाठी आहे, पैसे कमावण्यासाठी नाही. याचा प्रत्यय हजारो पक्षकाराना त्यांनी दिला आहे.
सन १९७८ ला ते विधान परिषदेचे सदस्य (आमदार) झाले. सन १९७८-८४ आमदारकीच्या  काळात महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, आदिवास, तसेच अर्थिक मागास वर्गाच्या संदर्भातील अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पध्दतीने समागृहात मांडून ते सोडवण्याचा प्रवत्न केला. आमदारकी लोकांचे राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी असते, व्यक्तीगत भल्यासाठी नसेते, है स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले. सरकारने सन १९७१-७२ च्या दुष्काळात धडक योजनेंर्तगत ग्रामीण भागात रस्ते बांधणी कार्यक्रम राबविला. या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी विनामोबदला घेतल्या गेल्या. मोबदला मिळणार नाही असा जि. आर. सरकारकडून काढण्यात आला, त्याचे कारण शासन तर्फे असे सांगीतले गेले की, या रस्त्याचा वापर ते शेतकरीच करतात. हा जी. आर. शेतकऱ्याच अन्यायकारक होता. या ग्रामीण भागातील सर्वव्यापी प्रश्नांना आमदार असताना विधी मंडळात वाचा फोडली व सरकारला खालील प्रमाणे जाब विचारण्यात आला. शहरात रस्ते बांधताना सबंधीतांच्या व्दारे जागा व जमीनी संपादन करता, त्यांना त्याचा मोबदला देता. ग्रामीण भागातील जमीन संपादनाला मोबदला देत नाहीत, ही शासनाची दुहेरी निती आहे, म्हणून शहरवासीयांना ज्या प्रमाणे मोबदला देतात, तसाच ग्रामीण शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला दिसाच पाहीजे हा प्रश्न लावून धरल्यामुळे लाखो शेतकऱ्याशी संबंधीत असलेल्या या संबंधीचा जी. आ. सरकारला रद्द करावा लागला. त्यावेळी महसूलमंत्री शालीनीताई पाटील ह्या होत्या. सन १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्र होरपळून निघाला होता. ग्रामीण जिवनाची दयनीय अवस्था झाली होती, शासनाच्या बेफिकीरवृत्तीच्या विरोधात शेकापची महाराष्ट्रभर उग्र आंदोलने चालू होती. ठिकठिकाणी पक्षाच्या वतीने भव्य मोर्चे निघत होते. आशा मोच्यापैकी वैराग व इस्मालपूर येथील शेकापच्या मोर्चाच्यावर  शासनाने मोर्चेकऱ्यांच्या न्याय मागण्याचा विचार न करता अंदाधुद गोळीबार केला.  वैराग येथील मोर्च्यातील आठ शेतकरी व इस्मालपूर मोर्च्यातिल दोन तरूण गोळीबारात ठार केले. या गोळीबाराच्या चौकशीच्या वेळी तात्यासाहेबांनी मोर्चेकऱ्यांनी बाजू घेवून पुंडलिका भेटी परब्रम्ह आले । गा! हे संताचे वाक्य युक्तीवाद वापरून सरकारला सुनावताना त्यांनी प्रत्यक्ष परमेश्वर पुडलिका भेटीसाठी आल्याचे पुराणातील उदाहरण देवून हे सरकार लोकशाहीतील जनता जनार्धनाला भेट देवून त्यांच्या मागण्याच विचार न करता मोर्चेऱ्यांना बंदुकीच्या गोळ्यानी ठार करतो या सरकारच्या  बेछुटवृत्तीची संभावना करीत शेतकऱ्याचे वकिलपत्र घेवून सरकारची गोळीबाराची घटना निदनीय  व   क्रूर असल्याचे निदर्शनास आणले.
 सन १९८१ मध्ये औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. तात्यासाहेब मंुबईहून औरंगाबादला प्रॅक्टीससाठी पुढे याच न्यायालयात न्यायाधीश म्हणून  त्यंाची नेमणूक झाली. सतत सर्वहाराने समाजाचा विचार करणारे, शेतकरी विद्यार्थ्यांना शासनाकडून প न्याय मागणारे  तात्यासाहेब न्यायाधीश असताना घटनेच्या चौकटीत राहून नैतिकतेचे अधिष्ठान ठेवून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी अनेक लोकहिताचे निर्णय दिले. उदा. नादेड जिल्ह्या- तील दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रमाण जास्त चालते म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्र बंद करण्याचा निर्णय दिला. हे परीक्षा केंद्र ग्रामिण भागातील होते व त्या केंद्रावर ग्रामीण भागातील ३०० विद्यार्थी, विद्यार्थीनी होत्या. परिक्षा केंद्र बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परगावी जा-ये करावे लागणार होते किंवा परीक्षा कालावधीन केंद्रस्थानी रहावे  लागणार होते. दोन्ही बाबी ग्रामीण विद्यार्थ्यांना ऐन परिक्षेत अडचणीच्या होत्या. या संदर्भात एक  विद्यार्थ्यीनी ने  याचिका दाखल केली. योगायोगाने ती तात्याहेबांच्या पुढे आली. या प्रकरणात निकाल देतांना कॉपीचा प्रकार बंद करा, ते प्रशासनाचे काम आहे. परंतू परिक्षा केंद्र बंद करून विद्यार्यांना वेठीस धरता येणार नाही म्हणून कॉपीमुक्त परिक्षा केंद्र चालू करण्याचा निर्णय दिला. या निकालातून साहेबांचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत आस्थेवाईकपणा व जिव्हाळा दिसून येते दुसरे उदा. शेतकऱ्यांच्या संदर्भात देता येईल. साखर कारखाने शेतक-यांना उसाचा दर कमी देत, म्हणून काही नगरच्या शेतकऱ्यांनी कारखान्यांनी द्यावयाच्यास उस दराबद्दल याचीक दाखल केली. दरम्याने शासनाने दराच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची समीती नेमली होती व या समितीने उसाच्या टनाला रू.७००/- भाव देणे परवडते असा निष्कर्ष दिला होता. कारखाने मात्र रू.३५०/- प्रति टन उसाला भाव देत होते. तात्यासाहेबांनी या सर्व परिस्थितीचा सांगोपांग विचार करून रू.६००/- प्रति टन उसाला भाव देण्याचा निर्णय दिला. हाच निर्णय पुढे सुप्रीम कोर्टाकडूनही थोड्याफार फरकाने कायम करण्यात आला, कारखाने मात्र या निर्णयापूर्वी प्रति टन रू.३५०/- उसाला दर देत होते. या निर्णयामुळे कारखान्याच्या मनमानी उस खरेदीच्या प्रकाराला आळा बसून लाखो शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा फायदा झाला.
तात्यासाहेबांच्या न्यायदानात रामशास्त्री प्रभुणेची न्यायनिष्ठुर होती, आपपरभाव मूळीच नव्हता, पण न्यायदान न्यायाधीशांना घटनात्मकदृष्ट्या मिळालेल्या अधिकारातून, अनेक लोकहितैषी निर्णय दिले. व समाजातील दुर्लक्षीत वर्गाना दिलासा दिला. त्याच बरोबर ऊस झोन बंदी शेतक-यांच्या हिताची नाही व घटनात्मकही नाही. शेतक-यांनी उत्पादीत केलेला माल, त्यांना देशाच्या कोणत्याही भागात विकता येतो. उसाची झोन बंदी शेतकऱ्याच्या निर्णय देवून शेतकऱ्या प्रती आपली संवेदना दाखवून दिली. असे अनेक लोकपयोगी, शेतकरी व शिक्षणक्षेत्रातील निर्णय देवून ईच्छा असेलतर न्यायाधीश असे निकोप निर्णय घटनेच्या अधिन राहून देवू शकतात हे सिद्ध केले तात्यासाहेबांनी स्वीकारलेला विचार सतत आचरणात आणला. ग्रामीण जनता, शेतकरी विद्यार्थी, शेतमजूर व कमकुवत घटकांना न्याय देण्याची देण्याची पद्धत त्यांनी जाणीवपूर्वक काम ठेवली.
तात्यासाहेबांच मित्र परिवार फार मोठा आहे. राजकीय, सामाजिक, शिक्षण, विधी, तसेच साहित्यीक किंवा अशा अनेक क्षेत्रात सामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत त्यांच्या जिव्हाळ्याचा संपर्क आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक गुणी पैलू आहेत. त्यांच्या अगदी सुरूवातीचे मित्र आजूही तशीच मैत्री कायम ठेवून आहेत. अगदी इंग्लंडला शिक्षण घेत असल्यापासून ते आज न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले तरी मैत्रीच्या आड पक्ष-पार्टी, जात-धर्म, व राव-रंक या बाबी येवू दिल्या नाहीत. एका अर्थनि ते अजात शत्रू आहेत. ते जेथे कोठे जातात किंवा जातील त्या त्या ठिकाणी त्यांच्या हृदयस्नेही मित्रांचा गराडा असतोच. बरे ही मैत्री दोन्ही बाजूनी निरपेक्ष अशीच राजा कधी रडत नसेल का, त्याला दुख कधी होत नसेल का, माशाच्या डोळ्यातील दुखः अश्रु पहता येत नाहीत. त्याच प्रमाणे साहेबांच्या जिवनात अनेक दुखा चे प्रसंग आले असतील, समस्या निर्माण झाल्या असतील, पण या घटनेचा त्यांनी आपल्या चेहऱ्यावर वागण्या-बोलण्यात कधी लवलेश येवू दिला नाही. अशा अनेक प्रसंगात दुखः स्वतःच पचवले. इतरापुढे त्याचे प्रदर्शन न करता सतत हसतमुखाने, धिरोदात्तवृत्तीने ते जिवन जगत आहेत. ऋजुता हा त्यांच्या आचाराच स्थायीभाव, सौजन्य ही वृत्ती, साहेब तसे मितभाषी, परंतु आपल्या मित्रा सोबत किंवा सहकांऱ्या सोबत असताना शाब्दिक कोट्या करून निखळ विनोद निर्माण करणे ही त्यांची खासीयत उपस्थित सर्वांनाच हास्याच्या कल्लोळात नाहून सोडणारी असते.
तात्यासाहेब हे संयत वृत्तीचे आहेत, त्यांच्या वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे. याचा त्यांना अजिबात गर्व नाही, आजपर्यंतचे साहेबांचे जीवन निरामय असे आहे. नैराश्य, नाराजी, अस्वस्थता ह्या बाबी त्यांच्याकडे कधीच दिसून आल्या नाहीत. ते सतत आनंदी व निरामय जिवन ते जगले. म्हणून मी त्यांना आनंदीयात्री म्हणतो.
त्यांना भावपूर्ण श्रध्दांजीली.............

                                                      अॅड. पी.एम. नळेगावकर उस्मानाबाद

 
Top