उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 श्रीपतराव भोसले हायस्कूल  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद या शाळेचे विद्यमान प्राचार्य श्री पडवळ एस,एस हे दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या प्राचार्यपदावर सध्या उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले श्री देशमुख एस ,एस यांची प्राचार्यपदी संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर पाटील यांनी नेमणूक केली तसेच उपप्राचार्य म्हणून श्री घार्गे एस के यांची नेमणूक केली
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री आदित्य पाटील संस्थेच्या संचालिका सौ प्रेमाताई पाटील, उपमुख्याध्यापक श्री कोळी एस.बी, अभिराम पाटील ,संस्थेचे सर्व शाखेचे पर्यवेक्षक विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष  सुधीर पाटील यांनी नूतन प्राचार्य उपप्राचार्य यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले. प्रशालेच्या उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नन्नवरे  एन.आर यांनी केले व आभार उपमुख्याध्यापक श्री कोळी एस.बी यांनी केले
 
Top