उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 शिक्षा संस्कृती उत्थान न्यास नवी दिल्लीच्या वतीने पदवीधर अंतिम वर्षाची परीक्षा घेऊनच निकाल तयार करावा या करिता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी यांनी निवेदन दिले.
 महाराष्ट्र राज्य शासनाने महामारी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून रोगावर अध्याप कुठल्याही प्रकारची प्रतिबंधित लस निर्माण झाली नाही हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांतर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता दोन वर्षाच्या सरासरी गुणाच्या आधारे अंतिम वर्षाचा निकाल तयार करण्याचा व परीक्षा रद्द करण्याचे शासनाने आदेश काढले असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली मातृभाषेतून शिक्षणाची चळवळ उभी करणारी शिक्षा संस्कृती उत्थान न्यास नवी दिल्ली चे सचिव अतुल कोठारी यांनी राज्यपालांना निवेदनात उपरोक्त पद्धत चुकीची असून यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वर्षात मेहनतीने अभ्यास करून जीवनाच्या भविष्याची अपेक्षा ठेवलेल्या असतात व देश-विदेशात अशा प्रकारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कुठल्या वर्गवारीत गणले जाईल याबद्दल शाशंकता असून महामारी रोग जागतिक पातळीवर असून मुंबई पुणे किंवा अनेक मोठ्या शहरात परीक्षा घेण्याजोगी परिस्थिती जरी नसली तरी ज्या विद्यापीठांना शक्य असेल त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घ्याव्यात कोरोना रोग प्रादुर्भाव निवळल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना न्याय द्यावा राज्यपाल महोदयांनी उपरोक्त विषयी शासनास आदेशां कित करावे ही नम्र विनंती चे निवेदन दिले असून शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे प्रत्येक राज्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय निवेदन राज्यपाल यांना पाठवण्यास सांगितले त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य मार्गदर्शक सुधीर पाटील जिल्हा संयोजक डॉ. अजित मसलेकर उपजिल्हा संयोजक शेषनाथ वाघ जिल्हा पदाधिकारी यांच्या स्वाक्षरीत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले .
 
Top