नळदुर्ग /प्रतिनिधी-
 युवा सेनेचे प्रमुख तसेच राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड.आशिष सोनटक्के यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळकोट (ता. तुळजापुर) गावांतील प्रत्येक नागरीकाला मोफत मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्याबरोबच गावांतील प्रत्येक नागरीकांची स्वता थर्मल स्क्रिनिंग टेस्ट करून घेतली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट उभे टाकले आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व गरीबांचे मोठे हाल झाले आहेत अशावेळी युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांत नागरीकांना मदत करावी असे आवाहन राज्याचे मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत युवा सेनेचे उस्मानाबाद जिल्हा उपप्रमुख अॅड.आशिष सोनटक्के यांनी जळकोट गाव कोरोनामुक्त ठेवण्याचा निर्णय घेऊन त्यांनी गावांत जोमाने काम सुरू केले. गावांतील प्रत्येक नागरीकाला मोफत मास्क तसेच सॅनिटायजरचे वाटप केले तसेच गावांतील प्रत्येक घरात जाऊन तसेच डवरी गोसावी राहत असलेल्या वस्तीवर जाऊन प्रत्येक नागरीकांची थर्मल स्क्रिनिंग टेस्ट करून घेतली वास्तविकपाहता कोरोनाच्या दहशतीमुळे आज कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही अशावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अॅड.आशिष सोनटक्के यांनी गावांतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे गावांतील एकाही नागरिकाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते कौतुकास्पद असुन त्यांच्या या कार्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याचबरोबर संपुर्ण गावात जंतुनाशक औषधांची फवारणी करून संपुर्ण गाव निर्जंतुकिकरण करून घेतले आहे. धाराशिव जिल्ह्यात युवा सेनेकडुन इतके मोठे काम होत आहे.अॅड.आशिष सोनटक्के यांच्या या कार्याचे कौतुक आहे.
 
Top