उस्मानाबाद/ प्रतिनिधी
श्री.संत गोरोबा काका नगर येथील रहीवाशी असणारे पोलीस बांधवाकडून कॉलनीच्या आरोग्याच्या व सौंदर्याच्या दृष्टीने पोहेकॉ श्री.पांडुरंग मस्के नेमणूक उस्मानाबाद शहर व श्री सुनिल यादव सेवानिवृत्त पोहेकॉ यांचे मार्गदर्शनाखाली दि. 28 जून रोजी श्री. संत गोरोबा काका नगर, सांजा रोड उस्मानाबाद येथे पोलीस कर्मचारी यांच्या वतीने वृक्षारोपन व रोपे वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
 हा उपक्रम  पोलीस नाईक किशोर कोळी नेमणूक वाहतूक शाखा, सोमनाथ भालेकर नेमणूक तामलवाडी, आगतराव कठारे नेमणूक बेंबळी, अमोल जावळे नेमणूक मोटार परिवहन, महेश कचरे नेमणूक जिविशा, राहुल जावळे नेमणूक मुख्यालय, भुंजग अडसूळ नेमणूक आंबी पो.ठा., आमोल तांबे नेमणूक हायवे टॅब, होमगार्ड शरीफ भेटेकर यांचे सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
 यावेळी श्री. सुनिल वाघ, भाऊसाहेब देटे, प्रतीक साळवे, विकास बळी, राकेश कचरे ,विजय तुपे, राजेश तुपे, धनंजय चांदणे, प्रमोद मगर, रूषीराज जाधव, विकास तोडकरी, विवेक यावलकर, सुधाकर भोसले, संजय शिंदे‍ व इतर नागरिक हजर होते.

 
Top