तुळजापूर/प्रतिनिधी
तालुक्यातील  शिराढोण येथे गावचा बाहेर असणाऱ्या रस्त्याच्या कडेला 35  वर्षीय अनोळखी  महिला  गेली तीन दिवसा पासून आजारी  अवस्थेत पडली होती.माञ कोरोना पार्श्वभूमीवर तिच्या जवळ जावुन तिची विचारपूस करण्यास कुणीही धजावत नव्हते अखेर उपजिल्हारुग्णालयातील डाँ.अमित शिरसीकर यांना याची माहीती मिळताच आरोग्य विभागाच्या 108 गाडीतुन तिला उस्मानाबाद येथील शासकीय  रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असुन तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
सदरील महिला तुळजापूरची असल्याची चर्चा असुन ती तिथे पोहचली कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.   गावकरी व आरोग्य विभागाने तिच्या मदतीसाठी धावुन आल्याने शेवटच्या क्षणी तिला योग्य ते उपचार मिळाल्याने सदरील  महिलेचा प्राण वाचले . शिराढोण (ता. तुळजापूर) हे पश्चिम महाराष्ट्र व  मराठवाडा च्या हद्दीवरील शेवटचे गाव असुन तेथुन पुढे सोलापूर जिल्हातील बार्शी तालुका सुरुवात होतो. शिराढोण गावच्या रस्त्यावर एक महिला गेली चार दिवसापासुन पडली होती.  कोरोनाच्या भितीने तिच्या जवळ कोणीही जात नव्हते तरीही गावकरी तिला जेवणपाणी विचारत होते माञ ती लोकांना प्रतिसाद देत नव्हती.
बरेच दिवस अन्न, ऊन, वारा, थंडी सहन करीत रस्त्यावर पडलेल्या महिलेची माहीती गावातील एका युवतीने  ने उपजिल्हारुग्णालयातील डाँ. अमित शिरसीकर यांना देताच त्यांनी  उपजिल्हारुग्णालयातील कर्मचारी हर्षद क्षिरसागर यास तिथे पाठवले नंतर तहसिलदार यांना माहीती कळवताचा त्यांनी  १०८ ऍम्ब्युलन्स  पाठवली व  काही वेळाने ती घटनास्थळी  पोहोंचली उपजिल्हारुग्णालयाचे कर्मचारी हर्षद  क्षिरसागर  शिराढोणचे सरपंच चंद्रकांत सोनवणे,पोलीस पाटील अमोल सोनवणे,ग्रामसेवक एस.एन.चौधरी, सुधीर सोनवणे,लखन पवार,राम घोळवे,बबन गंभीरे अदिनी तिला गाडीत ठेवुन तुळजापूर येथील उपजिल्हारुग्णालयात आणले तिचे गंभीर प्रकृती पाहता तिला पुढील उपचारासाठी उपजिल्हारुग्णालयच्या  वैद्यकीय  अधिकारी डाँ. चंचला बोडके यांनी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले.

 
Top