
कोरोना संसर्गजन्य विषाणू पार्श्वभूमीवर शहरात सुवासनींनी घरातच कागदावर तर काहींनी रांगोळीने वडाच्या झाडाचे चिञ काढून त्याचे पुजन करुन शहरी तर ग्रामीण भागात शेतातील वडाच्या झाडाचे पुजन करुन सोशल डिस्टंन्सिंग पाळुन सामाजिक बांधिलकी जपत सुवासिंनीनी पारंपारिक पध्दतीने वटपौर्णिमा साजरी केली.
आज वटपौर्णिमेनिमित्त पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी देविचा सिंहासनावर आंब्याचा आरास केला होता. यंदा वटपौर्णिमा सणावर कोरोना व आंबा तुटवडा संकट दिसुन आले. प्रशासनाने वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी शहरातील गावातील वडाच्या झाडाच्या ठिकाणी गर्दी करु नये घरातच वटपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सुवासनींनी वटपोर्णिमा साजरी केली.