तेर /प्रतिनिधी
वकृत्व शैलिमुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सतत चर्चेत असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील उच्च विद्याविभूषीत सक्षणा सलगर यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर  वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 सक्षणा सलगर या खा.सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या आहेत.  महाराष्ट्रातील सार्वञिक लोकसभा , विधानसभा निवडणूकीत  सक्षणा सलगर यांनी “स्टार प्रचारक” म्हणून राज्यात प्रचारसभा घेतल्या.  त्यांची कामाची पध्दत ,पक्षसंघटनमध्ये स्वतःला झोकून देऊन अहोराञ परिश्रम यामुळे पक्षश्रेष्ठीकडेही त्यांचे वलयही आहे.त्यानी तेर गाव सोडून पाडोळी (आ) मधून जिल्हा परिषदेचे तिकीट मागितले. तेथे त्यांनी विजय संपादन केला.जिल्हा नियोजन समितीवरही त्या बिनविरोध निवडून आल्या.  सक्षणा सलगर या धनगर समाजाच्या असल्याने व धनगर समाज राज्यात मोठया संख्येने असल्याने व राज्यात युवतींचे कुशल संघटन होण्यासाठी पक्षाला याचा लाभ होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यांचे नाव जवळजवळ निश्चीक मानले जात असून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यामध्ये सक्षणा सलगर यांचे पारडे जड मानले जात आहे.

 
Top