परंडा /प्रतिनिधी :-
 बाबासाहेब शिंदे हे परंडा तालुक्यातील मुगाव या गावचे रहीवाशी आहेत ते परंडा शहरामध्ये हेअर कटींग सलुन व्यवसाय करतात बाबासाहेब शिंदे यांचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर कांही दिवसांपुर्वी मुत्रपिंड प्रत्यारोपन शस्त्रक्रिया करण्यात आली होती यासाठी त्यांच्या आईचे एक मुत्रपिंड बाबासाहेबांसाठी प्रत्यारोपन डॉ.डि.वाय.पाटील हॉस्पीटल पुणे येथे करण्यात आले होते.प्रचंड खर्चीक आशी ही शस्त्रक्रिया स्वतःचा प्लॉट विकुन व कर्ज घेऊन पैसा उभा करुन बाबासाहेब शिंदे यांनी केली होती.
सध्या कोरोना रोगाच्य पार्श्वभुमीमुळे अनेक दिवसांपासुन सर्व हेअर कटींग सलुन व्यवसाय बंद आसल्यामुळे बाबासाहेब शिंदे यांचा हेअर कटींग सलुन व्यवसाय बंद आहे.त्यामुळे मुत्रपिंड प्रत्यारोपन शस्त्रक्रियेनंतर औषधोउपचाराचा खर्च खुप आहे त्यातच उदरनिर्वाह देखील होने अशक्य झाले आहे.कांही पत्रकार बांधवानी वर्तमानपत्रा मधुन बाबासाहेब शिंदे यांची आर्थिक विवंचना परीस्थीती  बाबत वाचा फोडली याची दखल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते गोविंद दळवी यांनी घेतली लगेच त्यांनी परंडा येथील वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते मोहनदादा बनसोडे,तानाजी बनसोडे ,धनंजय सोनटक्के यांच्याशी फोन द्वारे संवाद साधला व सोबतच बाबासाहेब शिंदे यांना ही धिर दिला.वंचित बहुजन आघाडी परंडा टिम ने मारूती बनसोडे जिल्हाअध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद तसेच आर.एस.गायकवाड जिल्हा प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शना नुसार बाबासाहेब शिंदे मुगांव येथील त्याच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांना जिवनाअवश्यक वस्तुंचे किट सोबत बंद पाकीट आर्थीक स्वरूपात मदत देखील केली.बाबासाहेब शिंदे यांचा वाढदिवस १५ जुन रोजी होता आर्थीक विवंचनेमुळे तो प्रथमच त्यांनी साजरा केला नाही हे पदाधिकाऱ्याना लक्षात आल्या नंतर वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेब शिंदे यांचा मनोबल वाढविण्यासाठी फेटा बांधुन केक कापुन वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी बाबासाहेब शिंदे यांची पत्नी दोन मुले उपस्थीत होते.सोबतच तानाजी बनसोडे वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणी सदस्य,जेष्ठ नेते मोहनदादा बनसोडे, जेष्ट साहीत्यीक तु.दा.गंगावने,प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,धनंजय सोनटक्के,मधुकर सुरवसे,दिपक ओव्हाळ,दयानंद बनसोडे,दिपक पौळ,सुखदेव कांबळे उपस्थीत होते.प्रथमच माणुसकीच्या भावणेतुन आपण मदत केली आपली व्यथा मांडताना बाळासाहेब शिंदे यांना गहीवरून त्यांचे डोळे भरूण आले.उपस्थीत पदाधिकारी यांना ही दुःख भरून आले होते.दिलासा म्हणून वंचित बहुजन आघाडी संपुर्ण टिम आपल्या पाठीशी आहे.आसा पदाधिकाऱ्यानी बाबासाहेब शिंदे यांच्या परीवारास या वेळी देण्यात आला.

 
Top