उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें)येथील व सध्या उस्मानाबाद येथील  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागात कार्यरत आसलेले प्रा.राजा जगताप यांनी   सध्याच्या कोरोना परिस्थितीत , लाॅकडाऊनच्या काळात २५मार्च पासून  उस्मानाबाद येथील परप्रांतीय विद्यार्थी,मजूर यांचेसाठी शासकीय यंञणांनी उभारलेल्या “निवारा केंद्रात” कोरोनाला न घाबरता ,प्रत्येक्ष जावून तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या,व्यथा जाणून घेतल्या होत्या तसेच रस्त्यांनी पायी चालत जाणाऱ्या कांही मजूरांच्या व्यथा प्रत्येक्ष भेटी घेऊन जाणल्या होत्या.तसेच उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यांने शहरातील गरिब व गरजू लोकांना अन्नदान, किट वाटप केले होते.उस्मानाबाद शहरात  लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थिनी यांनाही मदत केली होती आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कांही दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था, सामाजीक कार्यकर्ते ,लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मदतीवर ,कोरोनाचा वाढता पादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस कष्ट करत होते व त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना वाढत होत्या,स्थलांतरित मजूरांच्या व्यथा ,वेदना व त्यांच्या समस्या,विविध शहरात सोशेल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा!
कोरोनात घ्यावयाची काळजी,कोरोनामुळे झालेले बळीराजांचे नुकसान,मदतीसाठी सरसावलेले बळीराजे,क्वारंटाईनमुळे उद्भवलेल्या महिला मजूरांच्या समस्या,चारही लाॅकडाऊन राज्याची,मुंबईची चिंता कसे वाढवणारे ठरले आशा विविध विषयावर २५लेख त्यांनी सातत्याने लिहून कोरोनाबद्दल जागृती केली होती व या विविध विषयावरील २३लेखांना  विविध दैनिकातून प्रसिध्दी मिळाली होती.हे लिहिण्यासाठी त्यांनी स्पाॅटवर जाऊन ,कोरोना योध्दा होऊन काम केल्याने, त्यांचे हे सध्याच्या काळातील लेखणाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यातील विविध फौंडेशननी दखल घेऊन त्यांचा “कोरोना यौध्दा”विशेष मानपञ पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
ग्लोबल इंटरनॅशनल फौंडेशन, नागपूर .यांनी प्रा.जगताप यांना “कोविड योध्दा”म्हणून १८जून रोजी ,पुरस्कार देऊन फोंडेशनच्या चेअरमन मानशी ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य युवा परिषद महाराषट्र राज्य ,मुंबई यांनीही “कोविड यौध्दा “पुरस्कार दि.१६जून रोजी, देऊन परिषदेचे अध्यक्ष व पोलीस मिञ महासंघ मराराष्ट्र,राज्याचे अध्यक्ष मा.प्रविण प्रधान यांनी अभिनंदन केले आहे. छावा स्वराज्य सेना महाराषट्र राज्य पुणे यांनीही “कोरोना योध्दा”पुरस्कार दि.१५जून रोजी, देऊन अध्यक्ष मा.राम घायतिडक पाटील व अॅड.सोनाली घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.
डिजाइअर फौंडेशन ठाणे मुंबई यांनीही “कोविड योध्दा”पुरस्कार दि.१७ जून रोजी, देऊन अध्यक्ष मा.कमलेश भोईर यांनी अभिनंदन केले आहे.या अगोदर प्रा.राजा जगताप यांच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरी येथील ईगल फौडेशनने  त्यांना “कोविड योध्दा”पुरस्चार १५जून रोजी, देऊन फौंडेशनचे अध्यक्ष मा.विलासराव कोळेकर यांनी गौरव करून अभिनंदन केले होते.
प्रा .राजा जगताप यांनी सातत्याने “कोरोना”विषयावर लेखण केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यातील विविध फौंडेशन व सेवाभावी सामाजिक संस्थांनी त्यांना विशेश सन्मानपञ देऊन गौरव केल्याबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,.नानासाहेब पाटील(माजी नगराध्यक्ष उस्मानाबाद)भिमराव वेव्हळ (ए.पी.आय,एस.पी.आॅफिस उस्मानाबाद) अॅड.भारती रोकडे,कवी पंडित कांबळे,लेखक जयराज खुने,प्रा.सौ.एस.एस.फुलसागर,लेखक रविंद्र शिंदे,भाऊसाहेब अणदूरकर, प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.चंदनशिवे(दादा)आरसोलीकर यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top