
कोणते ही सरकार आले तरी महिला मंडळ, बचत गुट, महिला संस्था यांना विविध योजना चालवण्यास देऊन सक्षमीकरण केले जाईल, अशी घोषणा केली जाते परंतु प्रत्येक्षात मात्र आंगणवाडीतील बालकांना गरम व ताजा आहार पुरविण्याचे काम महिला संस्था व बचतगटाकडून काढून महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मुंबई यांना देण्यात आले आहे. त्यामुळे फार मोठया प्रमाणात महिला संस्था व बचत गटावर अन्याय झाला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या निवेदाप्रमाणे आम्हाला परत काम द्यावे, अशी मागणी उस्मानाबाद महिला बचतगट महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
हॉटेल रोमा मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महिला बचत गट महासंघाच्या मनिषा पाटील, मिना सोंमजी, कल्पना गायकवाड, किरण निंबाळकर, नसरीन बागवान, अनिता तोडकरी, शशिकला पाटील या उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, जाचक अटी टाकून टेंडर प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया ही आम्ही यशस्वीपणे पुर्ण केली. बचत गटाने गरम ताचा आहार पुरविण्याचे काम टेडर प्रमाणे सुरू केले. परंतू कोरोनाचे निमित्त करून १६ मार्च २०२० पासून आमच्याकडील काम बंद करण्यात आले. त्यांनंतर अधिक माहिती घेतली असता हे काम महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मंुबई यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली. उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण अंगणवाडयांना दि.१६/०३/२०२० पासुन आहार पुरविण्याचे काम कोरोना या महामारी मुळे बंद करण्यात आले आहे. माहे फेब्रुवारी २०२० मध्ये नवीन ई-निवीदा प्रमाणे आम्ही शहरातील अंगणवाडयांना आहार पुरवठा करीत आहोत. परंतू शासनाने कोरोना रोगाचा प्रसार व प्रार्दुभाव होवू नये म्हणून अंगणवाडीताल बालकांना गरम ताजा आहार ऐवजी त्यांना सुखा व कडधान्य घरपोच देण्याचे ठरविले आहे.परंतू हा निर्णय घेताना शासनाने महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था यांना कोणत्याही प्रकारची विचारना न करता परस्पर हे काम महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मुंबई या मोठया संस्थेला दिले आहे. वास्तविक पाहता महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था हे धान्य घरपोचे पुरविण्यास तयार आहेत. परंतू महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था हे पुरवठा कडून न घेता या मोठया संस्थेकडून हे काम करून घेण्यात येत आहे.
महिला मंडळ, बचतगट , महिला संस्था चे मार्च ,एप्रिल, मे, जुन २०२० या चार महिन्याचे उत्पादन केंद्राचे भाडे, लाईट बिल, सुरक्षा रक्षकाचा पगार इत्यादी खर्च सुरूच आहे. मागील चार महिन्यापासून कोणतेही काम नसल्याने महिला मंडळ,बचतगट, महिला संस्था ची उपासमार होत आहे. सध्या परिस्थती मध्ये शासनाने अनलॉक जाहिर केलेला आहे. त्यामुळे बाजार पेठ व जनजीवन पुर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून धान्य पुरवठा करून घेता ते रितसर व स्थानिक निवड झालेल्या स्थानिक महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था यांच्याकडून हे धान्य घरपोच पुरवठा करून घ्यावे. माहे जुलै २०२० पासून कच्चे धान्य घरपोच करण्याचे काम महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था बचत गटाच्या मुळ यंत्रणेस पुर्ववत आदेश द्यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.