उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या संदर्भात व दररोज होणा-या भाववाढीमुळे सामान्य जनतेची ससेहोलपट झालेली आहे. बाजारपेठेत माल वाहतुक, अॅटोरिक्षा व जिवनावश्यक वस्तुची दररोज दरवाढ होत असतांना कोरोनाच्या विषाणुमुळे नागरीक अगोदरच बेजार झालेले आहेत. ही अन्यायाकार दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भविष्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.धिरज पाटील यांनी दिला आहे.अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या मार्फत राष्ट्रपतीना सादर करण्यात आले.
या संदर्भात आज दि.२९ जुन २०२० रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार होते.परंतू धरणे आंदोलनास बंदी आदेश जा.क.२०२०/उपचिटणीस/एमजी/सीआर-२६ दि.१७/०३/२०२० अन्वये जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी आदेश पारीत केला आहे व जिल्हा प्रशासनाने विनंती केल्यामुळे आजचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगीत केले आहे. सदरचे निवेदन सादर करतांना जिल्हाध्यक्ष- अॅड.धिरज पाटील, मुख्य संघटक - राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष - लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष - अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक अध्यक्ष - सय्यद खलील सर, युवक काँग्रेसे प्रदेश सचिव - उमेश राजेनिंबाळकर, माजी प्रदेश सचिव - जावेद काझी, जिल्हा युवक - उपाध्यक्ष रोहित पडवळ, अॅड.विश्वजीत शिंदे, अभिषेक बागल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top