उस्मानाबाद/प्रतिनिधी-
  आजच्या घडीला पर्यावरण जपणं किती गरजेचे आहे याचा अनुभव आपण गेली कित्येक वर्षे झालं आपण घेत आहोत. वाढतं तापमान, पावसाची अनियमितता तसेच येणारी वादळं, गारपिटी अशा कैक समस्यांना आपण तोंड देत आहोत. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो, त्याचसाठी पर्यावरणाचं संवर्धन गरजेचं आहे. म्हणुन  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ॲड.व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
 यावेळी  ॲड.अजित गुंडा रुपामाता संस्थेचे भगिरथ जोशी .बोधले.शिंदे आदींची उपस्थिती होती. आज आम्ही देखील वृक्षारोपण करीत आहोत, तुम्ही देखील करा.. एकत्र येऊया पर्यावरण वाचवुया!! असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.

 
Top