उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात पुणे मुंबई सह इतर जिल्हे व राज्यातुन येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून हजारांचा आकडा शंभरावर आला. बाहेरील किंवा इतर राज्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली असून 10 एप्रिल ते 5 जून या काळात 31 हजार 138नागरिक आल्याची माहिती नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी दिली. या सर्वच्या सर्व नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यातील 22 हजार 596 जणांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन काळ संपला आहे तर 8 हजार 542 जण वैद्यकिय निगराणीखाली आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात 10 एप्रिल ते 5 जून या काळात 31 हजार 138 नागरिक बाहेरून दाखल झाले तर 5 जून रोजी 284 नागरिक दाखल झाले. उस्मानाबाद तालुक्यात 5279, तुळजापूर 6214, लोहारा 3593, उमरगा 4255, कळंब 4616, वाशी 1763, भूम 2508 व परंडा तालुक्यात 2810 असे 31 हजार 138 नागरिक झाले आहेत. यातील 9 हजार 208 जणांना घरी, 13 हजार 103 नागरिकांना शेतात, 8 हजार 192 जणांना शाळेत तर 160 जणांना इन्स्टिट्युटमध्ये व 475 जणांना इतर ठिकाणी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1840 नागरिकांचे कोरोना स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 1565 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 91 अहवाल प्रलंबित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आजवर 104 रुग्ण सापडले असून त्यातील 56 रुग्ण हे कोरोनामुक्त असून उर्वरित रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तीन जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 39 रुग्ण असून तुळजापूर 4, उमरगा 16, लोहारा 6, कळंब 21, वाशी 4, भूम 3 व परंडा तालुक्यात 11 असे 104 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले आहेत.
उस्मानाबाद शहरात कोरोनाचे तब्बल 21 रुग्ण असून जिल्ह्यात जे कोरोनाचे रुग्ण सापडले त्यातील बहुतांश रुग्ण हे पुणे, मुंबई, सोलापूर या कोरोनाग्रस्त भागातून आले असल्याने  बाहेरून येणार्‍या नागरिकापासून सर्वाधिक धोका आहे.
 
Top