उस्मानाबाद /प्रतिनिधी
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कोणताही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 11 लाख 46 हजार 631 आहे. या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 23 किलो गहु आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदुळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहु व 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदुळ दिला जातो. तसेच केशरी रेशनकार्ड असलेल्या एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहु व 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदुळ दिला जातो. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत विनाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 कि.ग्रॅ. तांदूळ व प्रतिकुटुंब 1 कि.ग्रॅ. अख्खा चणा मोफत दिला जातो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 5 कि.ग्रॅ. तांदूळ व प्रतिकार्ड 1 कि.ग्रॅ. चणादाळ किंवा तूरदाळ मोफत दिली जाते. माहे एप्रिल, मे व जून 2020 साठीची तूरदाळ व चणादाळ माहे मे 2020 च्या उत्तरार्धापासून प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत 3 महिन्यांच्या डाळीचे वाटप जून 2020 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी एक महिन्याची डाळ उचलली आहे, त्या लाभार्थ्यांना उर्वरित दोन महिन्यांची 2 कि.ग्रॅ. डाळ जून 2020 अखेर वाटप केली जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी एकाही महिन्याची डाळ उचल केली नाही. अशा लाभार्थ्यांना 3 महिन्यांची एकूण डाळ एकत्रितपणे माहे जून 2020 अखेर रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत मोफत वाटप केली जाणार आहे, सदरची डाळ लाभार्थ्यांनी उचल करावी.
माहे मे 2020 साठी उस्मानाबाद जिल्ह्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 1366.90 मे.टन नियतन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 1311.42 मे.टन धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. मंजूर नियतनाच्या 95.64 टक्के नियतन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. प्रा.कु.ला. योजनेअंतर्गत 4635.40 मे.टन. नियतन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 4549.37 मे.टन धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. मंजूर नियतनाच्या 98.14 टक्के नियतन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत 1293.75 मे.टन नियतन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 1165.10 मे.टन धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. मंजूर नियतनाच्या 90.06 टक्के नियतन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 5974.52 मे.टन एवढे धान्य मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 5462.18 मे.टन तांदूळ लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. मंजूर नियतनाच्या 95.33 टक्के नियतन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 29 हजार 452 लाभार्थ्यांना व 7 हजार 302 कुटुंबांना 147.62 मे.टन तांदूळ व 7.3 मे.टन अख्खा चणा नियतन मंजूर करण्यात आले आहे आणि रास्तभाव दुकानदार यांचेमार्फत वाटप सुरु आहे.माहे एप्रिल 2020 ते माहे मे 2020 या कालावधीमध्ये तक्रार प्राप्त झालेल्या रास्तभाव दुकानांवर प्राधिकारपत्र निलंबन करणे, रद्द करणे, अनामत रक्कम जप्तीची  कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 15 दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले, 27 दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली  तर 2 दुकानांचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले, अशा एकूण 44 रास्तभाव दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
 माहे जून 2020 साठी अंत्योदय योजनेअंतर्गत 1377.90, प्रा.कु.ला. योजनेअंतर्गत 4715.70, एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत 1293.75, आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 147.62 मे.टन तांदूळ व 7.3 मे.टन अख्खा चणा, एपीएल केशरी योजनेअंतर्गत 266.95 मे.टन व प्रधानमंत्री  गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तांदूळ, चणादाळ व तूरदाळ असे एकूण 5631.72 मे.टन. नियतन मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिलेल्या Social Distancding बाबतच्या सूचना व इतर सूचनांचे पालन करुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत आपल्या शिधापत्रिकेस देय असणाऱ्या धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.चारुशीला देशमुख यांनी केले आहे.
 
Top