तुळजापूर /प्रतिनिधी
 तिर्थक्षेञ तुळजापूर कोरोना पासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्नाचा ऐक भाग म्हणून नगरपरिषद ने शहरातील कुंटुंबातील 32942 शहरवासियांची थर्मल स्कँनिंग उपक्रम अंतर्गत तपासणी  योग्य ती खबरदारी घेतली म्हणून तिर्थक्षेञ तुळजापूर कोरोना मुक्त दिसत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोनाचा शिरकाव होणे हे धोकादायक असल्याने याचा शिरकाव होवू नये यासाठी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी अशिष लोकरे सह नगरपरिषद मधील सर्व विभागातील कर्मचारी खास करुन स्वछता विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रचंड काम केले त्यामुळे आजपर्यत तरी तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना रोखण्यास नगरपरिषदला यश आले आहे.
 सर्वांचे सहकार्य लाभले नगराध्यक्ष -रोचकरी
थर्मल स्कँनिग व आँक्सीजन तपासणी या दोन्ही मोहीम व्यापक पणे राबवल्या यासाठी संबंधित नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शहरवासियांनी या पुढेही असेच सर्व प्रकारचा नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले
 
Top