नळदुर्ग / प्रतिनिधी:
नळदुर्ग शहर व परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करुन ही त्या सोयाबीनच्या बीयानांची उगवण झाली नसल्याने पुन्हा एकदा दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडला आहे. बहूसंख्य शेतकऱ्यांनी खाजगी व महाबीज च्या पिशवीतील सोयाबीनच्या बियानांची पेरणी केली आहे पंरतु शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बियानांची उगवण झाली नाही त्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडल्याने या शेतकऱ्यांवर अर्थीक संकट कोसळले आहे. महाबीज कंपनीच्या पिशवीतील सोयाबीनच्या बियानांची उगवण झाली नसल्याने व बोगस बियानांचा पुरवठा करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधीत कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.
मृग नक्षत्राचा पाउस चांगला झाला असल्याने शहर व परिसरातील ग्रामीण भागातील डोंगराळ त्याच बरोबर मातीच्या जमीनीमध्ये पेरणी योग्य ओल झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस उशीर न करता तात्काळ खतांची आणि बियानांची खरेदी करुन जवळपास पन्नास टक्के क्षेत्रातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणी सुरु केली. दरम्यान बहूसंख्य शेतकऱ्यांनी महाबीज या कंपनीचे सोयाबीन चे बियाने खरेदी केले आहेत. पंचेवीस किलोची पिशवी कृषी सेवा केंद्रातून खेरदी करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. तुळजापूर तालुक्यातील बहूतांश शेतकरी खरीप पेरणीसाठी सोयाबीन या पिकाची निवड करीत आहेत. कारण सोयाबीन चा उतारा पाहता शेतकऱ्यांना सोयाबीन पिक परवडणारे आहे त्यामुळे तीन महीन्यात कमी कालावधी मध्ये हे निघणारे पीक आसल्या कारणाने तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात सोयाबीन च्या बियानांची पेरणी केली आहे. त्याच बरोबर तुळजापूर तालुक्यातील शेत जमीनी या सोयाबीन पिकासाठी उपयुक्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा सतत सोयाबीन पिकाकडे असतो. त्यामुळे या वर्षी ही मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे पंरतु बहूसंख्य शेतकऱ्यांच्या महाबीज कंपनीच्या घेतलेल्या बियानांची उगवणच झाली नाही, मोठया प्रमाणात खत आणि बियानासाठी पैसे खर्च करुन पेरणीचा ही खर्च बोकांडी बसवून शेतकरी आज पुन्हा दुबार पेरणीसाठी पैशासाठी सावकारांची पायरी झिझवत आहे. शहर व परिसरातील जळकोट, लोहगाव, चिकुंद्रा, मुर्टा, होर्टी, किलज, सलगरा दि., गंधोरा त्याच बरोबर ग्रामीण भागातील अन्य गावातील बहूसंख्य शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली असून सोयाबीनच्या बियानाची उगवण झाली नाही. त्यामुळे महाबीज सारख्या नामांकित कंपनीचे बियाने बोगस निघत असेल तर शेतकऱ्यांनी आता बियाने घ्यायचे तरी कोणत्या कंपनीचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर महाबीज कंपनी ही शासनाशी सलग्न असल्या कारणाने शेतकरी या कंपनीचे बियाने खरेदी करीत आहेत परंतु आता महाबीज कंपनीच्या सोयाबीन पिशवीतील बियानेच बोगस निघत आहे, त्या मध्ये उगवण क्षमता नाही त्यामुळे शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात महाबीज कंपनीने फसवणूक केली आहे म्हणून जिल्हाधिकारी यांनी या बाबत लक्ष घालून तात्काळ संबंधीत कृषी विभागाला सुचना करुन ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतील महाबीज कंपनीकडून घेतलेले बियानांची उगवण झाली नाही अशा शेतकऱ्यांचा पंचनामा करुन त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अर्थीक मदत करण्यासाठी शासनाला ही कळवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 
Top