नळदुर्ग / प्रतिनिधी:
नळदुर्ग शहरात आज नव्याने पाच कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडल्याने आता शहरातील कोरोना रुग्णांचा अकडा हा ११ झाला आहे. दरम्यान आजच्या वाढलेल्या पाच पॉझीटीव्ह रुग्णांमुळे शहरातील नागरीकांची भीती वाढली आहे. आता शहरात कडक जनता कफर्यु लागू करण्याची गरज आहे त्यासाठी प्रशासनाने नळदुर्ग शहरात जातीने लक्ष देण्याची गरज आहे. जनता कफर्यू लागू करण्यासाठी प्रशासनाने सक्ती केली तरी चालेल पण चार ते पाच दिवस जनता कफर्यूची आज शहराला गरज आहे.
दि. २० जून रोजी शहरात कोरोना विषाणूने बाधीत झालेले पाच रुग्ण आढळून आले आहेत, ते सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आसल्याने शहरातील इनामदार गल्ली व माउली नगर भागातील हे रुग्ण आसल्याने या भागात आता एकूण सात रुग्ण झाले आहेत. तर शहरातील एकूण रुग्णांची संख्या ही ११ झाली आहे. त्यामुळे या पूढे कोरोना विषाणूचा बाधीत रुग्ण वाढू नये असे वाटत असेल तर शहरात जनता कफर्यू ची अत्यंत गरज आहे. शिवाय अशीच परिस्थीती राहीली तर शहराची रेड झोन कडे वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही. तुळजापूर तालुक्यात सर्वात जास्त आज नळदुर्ग शहरात रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे नळदुर्ग करांची चिंता वाढली आहे, त्याच बरोबर आज वाढलेल्या पाच रुग्णांमुळे शहरात मोठया प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण या पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील किंवा नात्यातील आज वाढलेले रुग्ण आहेत परंतु जो १५ जून ला पॉझीटीव्ह आलेला जो रुग्ण आहे त्याच्याच संपर्कातील हा रुग्ण आहे त्यामुळे शहरातील धोका वाढला आहे. त्याच बरोबर या रुग्णाने शहरातील कांही प्रतिष्ठीत नागरीकांना ईदची पार्टी ही दिला होता, त्यामुळे या पार्टीला शहरातील दीडशे ते दोनशे नागरीक गेले आसल्याची चर्चा ही आता मोठया प्रमाणात होत आहे त्यामुळे शहरवाशीयांची चिंता वाढली आहे.
आता शहरात जनता कफर्यूची अत्यंत गरज आसल्याने प्रशासनाने सक्तीने शहरात जनता कफर्यू लागू करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा आजून ही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आजा प्रशासनाने जातीने लक्ष घालून जिल्हा पोलिस प्रमुखांनी आणि जिल्हाधिकरी यांनी प्रशासनाला जनता कफर्यू लागू करण्यासाठी सक्त आदेश देणे गरजेचे आहे. शिवाय याचे पालन न करणाऱ्या नागरीकांवर ही कडक कारवाईचा बडगा लावणे ही अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण या पूर्वी झालेल्या चार लॉकडाउनमध्ये नागरीकांनी शासनाच्या अटींचे पालन न करता आम्हाला काय होत नाही या अविर्भावात बाहेर पडणे बंद केले नव्हते, त्यामुळे आता शहरवाशीयांना शहरात नव्याने वाढत आसलेल्या रुग्णांमुळे भीती वाटत आहे.
 
Top