उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवार फाऊंडेशन संचलित शिवार संसद च्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर काय उपाययोजना करता येतील, यासाठी कार्यरत आहे. . 
सद्य:स्थितीत करोनामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्याला चिंतामुक्त करणं, या प्रमुख उद्देशाने शिवार हेल्पलाईन फक्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दि.1 जून 2020 पासून सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 06 या वेळेसाठी सुरू करण्यात आली आहे. शिवार हेल्पलाईन च्या 8955771115 या हेल्पलाईन क्रमांकावर शेतकऱ्याचा फोन आल्यानंतर शेतकऱ्याला प्राथमिक स्तरावर  मानसिक पाठबळ तज्ञ समुपदेशकाकडून दिले जाईल. शासकीय पातळीवर, सामाजिक संस्थांच्या पातळीवर व वैयक्तिक पातळीवर या त्रिस्तरीय उपायांच्या माध्यमातून शेतकऱ्याला समन्वय, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क, मदत केली जाणार आहे. अशा पध्दतीने ही शिवार हेल्पलाईन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अर्थातच ही हेल्पलाइन सेवा शेतकऱ्यांकरिता विनामूल्य असणार आहे.
 यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी परिवर्तन ट्रस्ट, मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, शैक्षणिक संस्था, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळाले आहे.अशी माहिती शिवार फाऊंडेशन चे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी दिली.

 
Top