लोहारा/प्रतिनिधी
 मुरूम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 27 जून 2020 रोजी उपप्राचार्य सुधीर अंबर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक - पालक यांची कोविड - 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्तिथीत 1 जुलै पासून इयत्ता 12  वीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार वरुन शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वर्ग सुरू करण्यासंबंधी विशेष बैठकीचे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सुधीर अंबर यांनी उपसचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 15  जून च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन तंतोतंत व्हावे यासाठी त्यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी याचे वाचन करून येणाऱ्या समस्यांचे निराकार करून कुठलीच भीती न बाळगता शासन व प्रशासन यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनापासून आपण सुरक्षित राहून 12  वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण चालू राहण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असलेल्या पालकांना आपल्या पाल्याची कोरोनापासून बचावासाठी कनिष्ठ महाविद्यालयाने घेतलेल्या व घेण्यात येणाऱ्या उपाययोजना माहिती देवून विद्यार्थ्यांचे प्रवेश करतेवेळी थर्मल स्क्रिनिंग, हात धुण्यासाठी सॅनीटायजर  व वर्गखोल्या पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्यांना कॉलेज आवारात प्रवेशापासून ते तास संपल्यानंतर बाहेर पडेपर्यंत त्यांची पूर्ण काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत पाण्याचे बॉटल, हातरुमाल,  सॅनिटायजरची छोटीशी बाटली सोबत आणण्यास व तोंडाला मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचेही नमूद करण्यात आले. प्राध्यापकांनी महाविद्यालयीन स्तरावर एप्रिलपासून  विद्यार्थ्यांचे वॉटस्अप ग्रुप तयार केले. युट्यूब व झुमअपचा वापर करून ऑनलाईन क्लासेसही घेण्यात आले होते. घेतलेल्या अभ्यासक्रमाचे आकलन किती झाले. यासाठी वेळोवेळी ऑनलाईनद्वारे मूल्यमापन करण्यासाठी चाचण्यापण घेतल्या गेल्या. विद्यार्थ्यांना घेतलेल्या चाचणीतील चुका विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये चालना मिळत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. प्रा.कल्याणी टोपगे व प्रा.करबसप्पा ब्याळे यांनी  मनोगत व्यक्त केले. प्रा.राजेश दलाल, प्रा.राजीव शाळू, प्रा.शिवाजी राजोळे, प्रा.डॉ.रमाकांत पाटील, प्रा.उमकांत महामुनी, प्रा.सतिश रामपूरे, प्रा.विष्णू शिंदे, प्रा.शोभा पटवारी, प्रा.शिवाजी राठोड, प्रा.राजशेखर त्रिगुळे, प्रा.आण्णाराव कांबळे, प्रा.सुधीर नाकाडे, प्रा.संजय गिरी, प्रा.अजित सुर्यवंशी, प्रा.नारायण सोलंकर, प्रा.सुरेश मुर्गे,  प्रा.राजकुमार नाईक, प्रा.दयानंद राठोड, आदींनी परिश्रम घेऊन ऑनलाईन झूमअपद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करत असल्याने त्यांचे पालकांकडून विशेष अभिनंदन करुन कौतुक करण्यात आले.

 
Top