उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागातील दोन रुग्णांसह तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथील दोन रुग्ण, सलगरा दिवटी येथील एक रुग्ण व तुळजापूर शहरातील एक रुग्णाचा समावेश आहे. तर उर्वरीत दोघांमध्ये बालाजीनगर उमरगा येथील एकाचा व वाशी येथे बाहेर देशातून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २०६ वर पोहोचली आहे. पैकी १५९ जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ८४ नवे रुग्ण, पाच जणांचा मृत्यू : सोलापूर | शहरात शनिवारी ५७, ग्रामीण भागात २७ असे जिल्ह्यात एकूण ८४ कोरोनाबाधित आढळले. शहरातील चार आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २४३३ (शहर २१४१, ग्रामीण २९२), मृतांची संख्या २५३ (शहर २३८, ग्रामीण १५) झाली आहे. ९२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एकूण ५३ जणांना (शहर ३४, ग्रामीण १९) शनिवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनावर १२२१ जणांनी मात केली आहेे.
 
Top