भूम/प्रतिनिधी-
गावागावांमध्ये फिरणारे पोस्टमन सोशल  मीडियामुळे गावातून फिरताना चे दिसत नाही जणू कि पोस्टमॅन गायबच झाल्यासारखे सुनेसुने वाटत आहे परंतु एका युवासेनेचे कार्यकर्ते प्रल्हाद आडागळे यांनी त्यांच्या  वाढदिवसा निमित्त सोशल मीडियावर आलेल्या शुभेच्छा चे आभार म्हणून प्रत्यक्ष पोस्ट कार्ड च्या माध्यमातून प्रत्येक स्नेह्यांच्या आभार मानण्यासाठी पोस्टमन च्या माध्यमातून पोस्टकार्ड पाठवले आहेत बरेच काळ पोस्टमॅन गावांमध्ये आला की गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उलट-सुलट चर्चा होत होती काहीतरी नवीन जुनी बातमी घेऊन पोस्टमॅन आला आहे याची आतुरता प्रत्येकाला लागत होती परंतु या डिजिटल स्पर्धेच्या युगामध्ये पोस्टकार्ड आंतरदेशीय कार्ड गायब झाले आहे गेल्या काही काळामध्ये पोस्टमन आपल्या घरापर्यंत सुख दुःखाची बातमी घेऊन येत होता त्यामुळे पोस्टमन यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता
या सोशल मीडियाच्या स्पर्धेच्या युगात मुळे प्रत्येकाचे संबंध दुरावले असून माया आणि ममता ही राहिलेली नाही सोशल मीडियाला बगल देत आपल्या कार्यकर्त्यांना व स्नेह जनांना पोस्ट कार्ड वरून शुभेच्छा आभार मानण्याचा माणस आखून वेगळा संदेश जनसामान्यात पोहोच झाला आहे सोशल मीडियामुळे करंट मेसेज लगेच मिळतात म्हणून पोस्टकार्ड ला लोक विसरले आहेत म्हणून पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन गावामध्ये न फिरल्यामुळे पोस्ट ऑफिस ची किंमत कमी झाले आहे परंतु महाआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये प्रत्येकाची किंमत वाढावी तसेच पोस्टकार्ड मुळेजूनी एक वेगळीच ओळख निर्माण होत आहे सोशल मीडिया इंडिया च्या माध्यमातून जेवढी ताबडतोब घडामोड होत आहे तेवढीच त्याची किंमत आणि भावनिकता उस्तुकता कमी होत असल्याचे दिसत आहे

 
Top