उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनाचा कहर जिल्ह्यात वाढत चालला असून जून महिन्याच्या सुरुवातीलाच शतकाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात आणखी 11 जणांच अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 88 वर गेली आहे.
 मंगळवारी उस्मानाबाद शहरातील सांजारोड भागातील उस्मानप्रा(संत गोरोबाकाका नगर) भागात 8 तर कळंब शहरात 2 आणि तालुक्यातील शिराढोण येथे 1 असे 3 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. उस्मानाबाद शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण हे एकाच कुटुंबातील असून ते नळदुर्ग येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले होते. तर कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव भागात आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील असून शिराढोण येथील बाधित काल मृत्यू पावलेल्या महिलेच्या नातवाला कोरोनाची लागण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून उस्मानाबाद, कळंब तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता अधिक वाढली आहे.
 मंगळवारी 55 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 11 पॉझिटिव्ह तर 44 निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 88 वर पोहचली असून तिघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 53 जणांवर उपचार सुरू असून 32 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

 
Top