कळंब /प्रतिनिधी-
पालिकेच्या गाळ्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेता येत नसून तो अधिकार राज्य शासनाकडे असल्याने आम्ही व्यापारी,सामाजिक संघटना व निवेदनकरांचे प्रश्न संबंधिता प्रशासनाकडे मांडू असे प्रतिपादन नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मागील कांही दिवसांपासून कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटीनुसार शहरातील व्यापार्यांना पालन केल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने पालिकेच्या गाळ्यातील व्यवसायिकांनी मागील कांही महिन्याचे भाडे पालिकेने करावे अशा प्रकारचे निवेदन शहरातील व्यापारी, सामाजिक संघटना तसेच विरोधकांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते.  शहरात नगरपालिकेचे जवळपास ५६६ गाळे आहेत.
याविषयी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते म्हणाले की,गाळे भाडे माफ करण्याचा अधिकार हा राज्यशासनाच्या स्वाधीन असतो, त्यामुळे आम्ही याबाबतीत संबंधितांचा गाळे भाडे माफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे दोन दिवसाच्या आत मेल द्वारे प्रश्न उपस्थित करू,प्रशासनाच्या निर्णयाला अधिन राहून प्रशासनाने दिलेला निर्णयाचे आम्ही योग्य ते पालन करू असे ते म्हणाले.

 
Top