नळदुर्ग /प्रतिनिधी
 नळदुर्ग मधील कंटेनमेंट झोन मधील नागरीकांना तुळजापूर तालुक्याचे नेते अशोक भाउ जगदाळे यांनी भेट देवून त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधा बददल चौकशी करुन या नागरीकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावा असे सांगून या कंटेनमेंट झोन मधील नागरीकांनी शासनाने सांगीतलेल्या अटींचे पालन करावे असे आवाहन ही यावेळी अशोक जगदाळे यांनी केले आहे.
नळदुर्ग मध्ये एक कोरोना रुग्ण सापडल्यानंतर शहरातील पोलिस ठाणा परिसरात किल्ला गेट व मुलतान गल्ली येथे कंटेनमेंट झोन म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने सिल केले आहे. त्या मुळे या ठिकाणच्या नागरीकांना आरोग्याच्या सुविधा बरोबर जीवनाश्यक वस्तूच्या बाबतीत त्या ठिकाणी नागरीकांशी चर्चा करुन या नागरीकांना शासनाने घालून दिलेल्या आटी व सामाजिक अंतर, तोंडाला मास्क लावणे, घरातून बाहेर न पडणे या बाबी कटाक्षाने नागरीकांना पाळाव्यात असे आवाहन या वेळी अशोक जगदाळे यांनी केले आहे. दरम्यान या भागातील नागरीकांना भेटून त्यांच्या आरोग्याची चौकशी ही यावेळी त्यांनी केली. त्यांच्या सोबत नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक आमृत पूदाले, किशोर नळदुर्गकर, शब्बीर कुरेशी, गणेश मोरडे, नवल जाधव आदी उपस्थीत होते. दरम्यान या कंटेनमेंट झोन मधील कुटूंबाना जीवनाश्यक किटचे वाटप ही अशोक जगदाळे यांच्या कडून करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अर्सेनिक अल्बम ३० या गोळयांचे ही वाटप त्यांच्या कडून केले जाणार आहे.

 
Top