तुळजापूर / प्रतिनिधी-
 येथील युवा  आडत व्यापारी अभिषेक कोरे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर गोरगरीब गरजू  लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नेय म्हणून   तुळजापूर शहरातील गरीब व गरजू आशा  100 लोकांना स्व खर्चातून अन्न धान्य  चे किट  वाटप केले.सदरील कार्यक्रम आडत बाजार येथे संपन्न झाला
कोरोना येवुन अडीच महिने झाल्याने सध्या मदतीचा ओघ आटल्याने त्यांनी ही केलेली मदत गोरगरीबांनसाठी मोलाची ठरली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. यासाठी त्यांना सुरज पाटील,संदीप औटी,प्रमोद भिसे,अर्जुन माळी,प्रभाकर भिसे यांनी साहाय्य केले

 
Top