उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कसबे तडवळे  सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात संपन्न झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत कसबे तडवळे येथील जि.प. आदर्श कन्या प्राथमिक शाळा व  जि.प.आदर्श केंद्रीय प्राथमिक  शाळा यांनी घवघवीत यश संपादन केले..सदरील परीक्षा ही ११ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथील केंद्रावर झाली होती.१९ जून २०२० रोजी या निवड परीक्षेचा निकाल  जाहीर झाला.
यामध्ये कन्या शाळेत मार्गदर्शन घेतलेल्या ६ मुली तर केंद्र शाळेत मार्गदर्शन घेतलेले ३ विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. ग्रामीण साठी राखीव असणाऱ्या ६० विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थी  तडवळे येथील शाळेत मार्गदर्शन घेतलेले आहेत.त्यामध्ये कन्या शाळेतील  श्रावणी सोलवट ,आरोही सुरवसे, सानिका डोलारे,पायल कसबे , आर्या कांबळे, संस्कृती लांडगे,  यांचा समावेश आहे.तर केंद्रीय प्रा. शाळेतील यश गाढवे,प्रसन्न जमाले,तेजस बाराते यांचा समावेश आहे.प्रत्येक वर्षी प्रमाणे दोन्ही शाळांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.दोन्ही शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीमध्ये पूर्णवेळ नवोदय अभ्यासक्रम विनामोबदला शिकवला जातो.तसेच वर्षभर  शाळेची वेळ सोडून सकाळी व संध्याकाळी चार तास जादा तास घेतले जातात.या शाळा मध्ये दिवाळी पूर्वीच  नवोदय अभ्यासक्रम पूर्ण केला जातो व त्यानंतर तीन महिने सराव परीक्षा घेतल्या जातात.सराव परीक्षा मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना वेळोवेळी कार्यक्रम घेवून हजारो रुपयांची बक्षिसे पालक मेळाव्यात दिली जातात .
या विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे,बाळासाहेब जमाले ,शहाजी पुरी ,सुरेखा कदम,संजय देशटवाड,गोविंद देवशेटवाड,गणपती यावलकर,दत्तात्रय मगर,शीलरक्षा शिंगाडे,अजय जानराव,अनिता देशमुख,अंबिका कोळी,राणी अंधारे ,रामकृष्ण ढवळे या पाचवी ते सातवी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.त्याच बरोबर या विद्यार्थ्यांना  पहिली ते चौथी पर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या सर्व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, गटशिक्षण अधिकारी प्रकाश पारवे,विस्तार अधिकारी किशोरी जोशी,केंद्रप्रमुख प्रमोद अनपट यांनी अभिनंदन केले आहे.तसेच या सर्वांना मुख्याध्यापिका सौ सुरेखा टोने,मुख्याध्यापक श्री रहेमान सय्यद,शाळा समिती अध्यक्ष श्री प्रभाकर गुळवे व अध्यक्ष श्री मंगेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
Top