लोहारा/प्रतिनिधी
कोरोना संकटाच्या काळात लोहारा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा दै.भास्कर तालुका प्रतिनिधी पत्रकार इक्बाल मुल्ला यांनी जीवाची परवा न करता सोशल मिडीयाच्या माध्यमातून व बातम्याच्या माध्यमातून जे योगदान दिले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचा नागरी गौरव पुरस्कार सोमवारी दि. 29 जून 2020 रोजी राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांनी जाहीर केला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम न घेता अप्रत्यक्षरित्या ऑनलाईनद्वारे सन्मानपत्र ई - मेलद्वारे पाठवून सन्मानित करण्यात आले आहे.
या त्यांच्या गौरवाबद्दल भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, भाजप मीडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, राजाभाऊ वैद्य, मोतीचंद बेदमुथा, संतोष जाधव, प्रशांत कावरे, अविनाश गायकवाड, संतोष हंबीरे, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्स्पिटल्सचे डॉ. दिग्गज दापके-देशमुख,   अभयभैय्या चालुक्य,  कैलास   शिंदे,  राजेंद्र पाटील,   विक्रांत संगशेट्टी, शब्बीर गवंडी,  आयुब अब्दुल शेख,  अॅड.जहीर चौधरी,  आयुब हबीब शेख लोहारा,  दगडू तिगाडे, बालाजी चव्हाण, शिवाजीराव गिड्ढे ,नीळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, अशोक दुबे, गणेश खबोले, कालिदास गोरे, संत बायस, सचिन ठेल्ले, यशवंत भुसारे, अब्बास शेख, शिवशंकर हत्तर्गे, बालासिंग बायस, सिद्धू गोपने, भिकाजी जाधव,  दादा मुल्ला,लोहारा तालुका पत्रकार संघ, मराठी पत्रकार संघ आदींनी त्यांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.
 
Top