कळंब /प्रतिनिधी
कळंब नगर परिषदेने आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक साहित्याची खरेदी करावी यासाठी माजी नगरसेवक शिवाजी कराळे यांनी मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सविस्तर, कळंब शहराची लोकसंख्या ३० हजार च्या आसपास आहे. नगर परिषदे कडे स्वतंञ आरोग्य विभाग असुन त्याद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. परंतु या उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेकडे एकच फवारणी मशीन व एकच धुर फवारणी मशीन आहे. एका विभागातुन फवारणीस सुरवात केली तर अंदाजे शेवटच्या विभागात जायला एक महिना लागतो. आपातकालीन परिस्थिती मध्ये नगर परिषद हि किरायाने आणुन फवारणी करते. तसेच या मशीन तीन चाकी गाडीवर बसविल्यामुळे त्या गल्ली बोळात येऊ शकत नाहीत. शहरात पाच झोन असुन प्रत्येक झोन ला स्वतंञ एक फवारणी मशीन व एक फाॅगीन मशीन गरजेची आहे. त्यामुळे आठ दिवसाला फवारणी करणे सोपे जाईल. यासाठी पाच फवारणी मशीन, पाच धुरफवारणी मशीन व दोन हातातील धुरफवारणी मशीन खरेदी कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
सध्या पावसाळा तोंडावर आला असुन साथीचे रोग पसरू शकतात. यासाठी वेळोवेळी फवारणी करणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी यासर्व मशीन नगर परिषदेने तातडीने खरेदी करत, किंवा आर्थिक अडचण असेल तर शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी शिवाजी कराळे यांनी केली आहे.
 
Top