उस्मानाबाद/प्रतिनिधी -
 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयासाठी तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून श्रीमती. सुषमा शालिवाहन लोमटे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. मग्रारोहयोच्या कामाबाबत नागरिकांच्या कांही तक्रारी असल्यास तक्रार निवारण प्राधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात आवश्यक कागदपत्र व पुराव्यासह तक्रारी सादर करावीत.
तक्रारीसाठी  श्रीमती. सुषमा शालिवाहन लोमटे, तक्रार निवारण प्राधिकारी (मो. क्र.9765794630) उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद दुरध्वनी क्र. 02472-222279  येथे संपर्क साधावा.

 
Top