उस्मानाबाद/ प्रतिनिधी
रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या मातोश्री स्व.रूपाबाई विश्वनाथ गुंड यांची १६ वे पुण्यस्मरण शनिवार दि. २७ जून २०२० रोजी संपन्न झाला.
प्रारंभी रूपामाता मल्टिस्टेट व अर्बनच्या सर्व शाखामध्ये स्वर्गीय रूपाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उस्मानाबाद शहरातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या पाठीमागील मैदानात वृक्षलागवडीसाठी रूपामाता उद्योग परिवाराचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड, मारुती सूर्यवंशी, अॅड. निवृत्ती कुदळे, संस्थेचे एम.डी. भगिरथ जोशी, सत्यनारायण बोधले, मिलिंद खांडेकर, अजित गुंड, अंजली गुंड, सोमेश्वर शिंदे,  यांच्यासह ८० लोंकांनी ४०० खड्डे खोदले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, तहसीलदार गणेश माळी आदींनी भेट देऊन केलेल्या कामाचे कौतुक केले. वृक्षलागवडीसाठी घेण्यात आलेल्या या खड्डयामध्ये २ जूलै रोजी करण्यात येणार, अशी माहिती बोधले यांनी दिली.
यावेळी बोलताना व्यंकटराव गुंड म्हणाले की,  कै. रूपाबाई विश्वनाथ गुंड यांनी केलेल्या संस्कारामुळेच समाजासाठी व शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्याच नावाने रूपामाता अर्बन मल्टीस्टेट, दुध प्रकल्प आदी उद्योग उभारले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
 
Top