परंडा / प्रतिनिधी :-
राज्य परिवहन महामंडळच्या परंडा येथील प्रस्तावीत बसस्थानकाच्या जागेवर अज्ञात लोकांनी रविवार दि.२१ रोजी अतिक्रमण केले आहे.यामुळे परंडा बस आगार अतिक्रमणधारकांच्या विळख्यात सापडला असून या बाबत परंडा आगारप्रमुख राहूल वाघमोडे यांनी अज्ञात अतिक्रमण धारकांविरुध्द परंडा पोलीस ठाण्यात तक्रारी निवेदन सोमवार ( दि. २२ ) दिले आहे . याामुळे काय कारवाई होणार ? याकडे लक्ष लागले आहे .
 निवेदनात म्हटले आहे कि, सोनारी रोड व बावची रोड या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत काही तात्पुरत्या स्वरूपात बांबु रोऊन त्याला हिरवे कापड लावून अतिक्रमण करून त्या ठिकाणी दुकान मांडून कांही अज्ञात लोकांनी अतिक्रमण केलेले आहे . तसेच सोनारी रोड या ठिकाणी काही लोकांनी चांगल्या प्रकारचे पत्रा शेड तयार करून अतिक्रमण केले आहे . राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रस्तावित बसस्थानकाच्या तीन्ही बाजूच्या सीमेवर अँगल रोवुन त्याला पेंडींग करण्यात आलेले आहे . तरी या जागेवर राज्य परिवहन महामंडळामार्फत आरसीसी बांधकाम करण्याचे मंजूर झाले असून ते बांधण्या करीता संरक्षण मिळावे .जेणेकरून अतिक्रमणाचा विषय मार्गी लागू शकतो व तसेच सध्या कुंपन भिंतीचे काम करण्यापूर्वी त्या ठिकाणी जेसीबी लावून चर खोदण्यात येईल . तरी या कामा करीता आपणा मार्फत कार्यवाही करण्यात यावी . माहितीस्तव निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, विभाग नियंत्रक, परंडा तहसिलदार, मुख्याधिकारी व सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना निवेदन माहितीस्तव पाठवण्यात आले आहे.याबाबी कडे काय कारवाई होणार नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 
Top