उस्मानाबाद / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.३१ में,२०२० रोजी राज्यातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार नसल्याचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात बोलताना  मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याची जशी आम्हाला काळजी आहे तशीच त्यांच्या आरोग्याची देखील काळजी आहे. अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत झालेल्या सत्र परीक्षांमधिल गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल असे मुख्यंत्र्यांनी सांगितले.
 कोरोणामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतिचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कुठलाही धोका उत्पन्न झाला नाही पाहिजे अशी खंबीर भूमिका राज्याचे कॅबिनेटमंत्री तथा युवासेनाप्रमुख अॅड. आदित्य ठाकरे ठाकरे यांची देखील होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी दि.२३ मे,२०२० रोजी युजीसी चे चेअरमन प्रा. डि.पी.सिंग यांना पत्र देत संपूर्ण महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सर्व सत्रातील एकूण गुणांनुसार उत्तीर्ण करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना असे वाटते की,मागील सत्रातील गुणांनुसार अंतिम सत्राच्या गुणांमध्ये नुकसान होत आहे त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी ऐच्छिक पर्याय देऊन घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कुठल्याही परिस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही असा विश्वास देत ज्या विद्यार्थ्यांना असे वाटते की, आपण जास्त मार्क मिळवू शकतो, त्यांच्यासाठी योग्य वेळी परीक्षा घेण्यात येईल असेल जाहीर केले. सदर निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.विध्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आभार मानुन विद्यार्थी हितासाठी कायम संवेदनशील असल्याबाबत कॅबिनेट मंत्री तथा युवासेनाप्रमुख अॅड.आदित्य ठाकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
 
Top