कळंब / प्रतिनिधी
कळंब शहरातील सावरगाव या भागात शनिवारी 5 रुग्ण सापडल्याने सदरील भाग सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ-होळे यांनी हे आदेश दिले आहेत. पुनर्वसन सावरगाव भागात रुग्ण सापडल्याने इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्याचबरोबर कंटेंटमेंट भागातील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. 12 जून 2020 पर्यंत हा आदेश काढण्यात आला आहे.
पूर्व बाजू – मारुती मंदिर ते रिंग रोड रस्ता, पश्चिम बाजू – बस डेपोच्या पाठीमागील बाजू, दक्षिण बाजू – बाजार मैदान ते रिंग रोड रस्ता, उत्तर बाजू- छत्रपती शिवाजी महाविद्यालय पूर्व बाजू रस्ता,  हा भाग सील करण्यात आलेला आहे.  कंटेंटमेंट झोन मध्ये फक्त अत्यावश्यक बाबी म्हणजे किराणा आणि औषधी दुकाने यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. इतर अस्थापणा उघडण्यास परवानगी नसणार आहे. ● कंटेंटमेंट झोनमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही, वैद्यकीय निकट वगळता इतर कोणत्याही बाबींसाठी कंटेंटमेंट झोनमधील व्यक्तींना बाहेर जाता येणार नाही, ● 65 वर्षावरील व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील बालके यांनी घरीच राहणे अपेक्षित आहे.● या भागातील लोकांनी घराबाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टन्सचा पालन करणे अनिवार्य आहे.● किराणा आणि औषधे दुकानासमोर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनला  कंटेंटमेंट भागातील नागरिकांसाठी  देण्यात आल्या आहेत. 
 
Top