तुळजापूर/ प्रतिनिधी
तालुक्यात मान्सुनपुर्व वळवीच्या पावसाचे आगमन रविवार दि.31 रोजी झाले असुन या पहिल्याच पावसात तालुक्यात सरासरी 8.4 मि. मि पाऊसाची नोंद झाली आहे. या पहिल्याच पावसात माञ नळदुर्ग शिवारात दोन बैल वीज पडून ठार झाल्याची घटना घडली आहे.
तुळजापूर तालुक्याची 802.54 मिमि  पावसाची सरासरी यात रविवारी 8.4मिमि पाऊस पडला आहे. यात सर्वाधिक पाऊस नळदुर्ग भागात 30 मिमि तर त्या खालोखाल तुळजापूर विभागात 11 मिमि पाऊस पडला आहे. या झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची खरीप पेरणी तयारीसाठी लगबग सुरु झाली आहे.    तुळजापूर तालुक्यात मध्ये तुळजापुर शहरात - 11mm(11), मंगरूळ- 02mm(02), सावरगांव- 03mm(03),नळदुर्ग - 30mm(30), जळकोट-10mm(10), सलगरा दि- 03mm(03), ईटकळ-  00mm(00) पावसाची नोंद झाली  नोंद झाली तर तालुक्यात एकुण पडलेला पाऊस  59mm(59) आहे. 
 
Top