उस्मानाबाद /प्रतिनिधी-
ट्रकवर टाकलेले आच्छादन फाडून चार क्विंटल हळकुंड लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांच्या पेालिसांनी दोन दिवसात मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून हळकुंडांची पोतेही हस्तगत करण्यात आले आहेत.
सांगलीकडे हळकुंड घेउन जाणारा ट्रक (क्र. एमएच २२, एए ०७७७)शनिवारी रात्री ११ वाजता येरमाळा येथे महामार्गाच्या पुलाखाली थांबला होता. यावेळी चालक अमोल रामराव राठोड (रा. परळी, ‍जि. बीड) यांना चोरीचा संशय आला. यांनी ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या पाठीमागील बाजूचे टार्पोलीन फाडून आतील प्रत्येकी ५० किलोचे चार क्विंटल हळकुंड असलेली ८ पोती लंपास केल्याचे आढळून आले. ४८ हजारांचे याप्रकरणी येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तेरखेडा येथून ३ अल्पवयीन चोरट्यांना मुद्देमालास पकडले. उर्वरीत तपासकामी त्या तीघांस येरमाळा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष खांडेकर, मधुकर घायाळ, भागवत झोंबाडे, तानाजी माळी, विजय घुगे, समाधान वाघमारे आदींनी केली.
 
Top