उस्मानाबाद / प्रतिनिधी
 जिल्ह्यात रविवारी आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात संभा येथील पूर्वीच्या संपर्कातील 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर नळदुर्ग येथे 50 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.
 रविवारी 90 जणांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 रिपोर्ट प्राप्त झाले असून यात 75 निगेटिव्ह असून 2 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 3 संदिग्ध आहेत. प्रलंबित असलेले 10 रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या प्राप्त होतील. यामध्ये उस्मानाबाद 7 तर परंडा तालुक्यातील 3 स्वबचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
 जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 73 वर गेली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांची चिंता अधिकच वाढली असून बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी आता अधिक खबरदारीने आणि काळजीपूर्वक राहाणे गरजेचे आहे.

 
Top