लोहारा/प्रतिनिधी
 आलूर जिल्हा परिषद गटातील आलूर, वरनाळ,  वरनाळवाडी, केसरजवळगा, कंटेकूर, बेळंब, कोथळी, आनंदनगर, गणेशनगर येथील सरपंच व ग्रामसेवक यांची व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक रविवार (ता.१४) रोजी घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी बसवराज पाटील यांनी गावनिहाय सर्व गावांचा विविध विकास कामांचा आढावा घेतला. कोरोना संकटाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. गावातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. पाणी टंचाई, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना बाबत चर्चा केली. तसेच ज्या शाळांमध्ये बाहेर गावांवरून आलेल्या नागरिकांना कॉरंनटाईन करण्यात आले आहे. त्या सर्व शाळा निरजंतुकीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. पावसाळा सुरुवात होत असल्याने पशु वैद्यकीय अधिकारी यांनी जनावराचे लसीकरण करुन घेण्यासंदर्भात प्रतिबंधनात्मक उपाययोजनांच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
 या चर्चेत माजी पंचायत समिती उपसभापती गोविंद पाटील, पंचायत समितीचे सदस्य गुलाब राठोड, गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम, पाणी पुरवठा उपअभियंता प्रविण पाटील, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्ताराधिकारी प्रकाश चव्हाण आदिंनी सहभाग घेऊन विशेष समस्यांबाबत चर्चा करुन काय करता येऊ शकेल याबाबत आपआपली मते मांडली.
 
Top