तुळजापूर /प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय धोरणानुसार काम करणाऱ्या १७ आशा कार्यकर्तींना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट तर्फे हे राज्यातील आरोग्य सेवकांना फेसशिल्ड मास्कचे वाटप करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने मंगरुळ प्राथमीक आरोग्य केंद्र जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे , गोकुळतात्या शिंदे,धन्यकुमार पाटील ,डाँ.जहागिरदार (CHO), शशीकांत नवल, अमर चोपदार, दुर्गश सांळुके, शशीकांत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत अाशा कार्यकर्त्यींना फेस शिल्ड चे वितरण करण्यात आले
यावेळी बबन गावडे,रुबाब पठाण,अनिल पारवे,दिनकर,विजय सरडे,संदिप गंगणे,शरद जगदाळे,सचिन कदम,गणेश नन्नवरे ,दुर्गेश साळुंके,शशी नवले,महेश चोपदार,अभय माने,मनोज माडजे यांची उपस्थिती होती .

 
Top