परंडा /प्रतिनिधी  -
शेत रस्ता कामाच्या कारणावरून देवळाली ता.भुम येथिल बाजीराव तांबे यांची  धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली ही घटना देवळाली ता.भुम येथे दि.२६ मंगळवार रोजी रात्री ८-३० वाजता घडली या प्रकरणी परंडा पोलिसात १२ जणांविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील एक आरोपी अटक तर ११ जण फरार आहेत.
या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की देवळाली ते वंजारवाडी शेत रस्त्याच्या कारणा वरून यातील आरोपी सोबत बाजीराव कल्याण तांबे यांचे दि.९ मे रोजी भांडण झाले होते. याच कारणाने मनात राग धरून आरोपी चंद्रकात रावसाहेब तांबे, व इतर ११ जण सर्व राहणार देवळाली यांनी संगणमत करून व पाळत ठेऊन  बाजीराव तांबे हे मोटार सायकल वरून बार्शी येथे जाण्यासाठी निघाले असता ग्रामपंचायत कार्यालया समोरील रस्त्यावर त्यांची मोटार सायकल अडऊन धारदार हत्याराने बाजीराव कल्याण तांबे यांच्या पोटात भोसकुन व हतावर सपासप वार करून हत्या केली.
गंभीर जखमी बाजीराव तांबे यांना उपचारासाठी तातडीने बार्शी येथिल जगदाळे मामा हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचा मुत्यू झाला आहे. वरील घटनेची माहिती मिळताच भुम चे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटणास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वरील १२ आरोपी विरुद्ध परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद हे करीत आहेत .
 
Top