परंडा/ प्रतिनिधी : -
 परंडा तालुक्यातील जेकटेवाडी हे अगदी मराठवाड्याच्या सीमेवर असणारे खेडेगाव आहे. दि.२२ रोजी येथे जनविकास सामाजिकसंस्था जेकटेवाडी , ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्यकेंद्र ताकमोडवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत घरोघरी जाऊन थर्मामीटरच्या सहाय्याने संपूर्ण कुटुंबातील सदस्याचे तापमान मोजण्यात आले.तसेच गावात वेळोवेळी  जंतूंनाशक फवारणी करण्यात आली आहे.
जेकटेवाडी जवळच काही अंतरावर असलेल्या खंडेश्वरवाडी गावात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्या पार्श्वभूमीवर गावासाठी आवश्यक उपाययोजना  हणून गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.या कामांसाठी गावातील तरुणांची निवड विना मोबदला काम करण्यासाठी ग्रामपंचायत  मार्फत करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावा वरून येणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे.
 मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यरत असणारे गणेश तांबे यांच्या संकल्पनेतून  स्वराज्य प्रतिष्ठानने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात,गर्दी टाळत रक्तदान शिबीर देखील घेतले आहे.या शिबिरात 31रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
यावेळी गावचे सरपंच गणेश जेकटे,ग्रामसेवक, पोलीस पाटील रवींद्र तांबे,डॉ.संजय ठाकरे , जनविकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.ताई लांडे ,गणेश तांबे, शहाजी तांबे,राजेंद्र भोगील,लांडे सर व ग्रामसुरक्षा दलाचे स्वयंसेवक या सर्वांनी सोशल डिस्टिंगचे पालन करून  उपस्थितीत होते. ग्रामस्थांनी विविध उपाय योजना राबविल्या बद्दल जेकटेवाडी करांच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

 
Top