
उस्मानाबाद /प्रतिनिधी-
रुईभर (ता. उस्मानाबाद ) येथील तरुण शेतकरी प्रवीण नंदकुमार पाटील (वय 32) यांचा शुक्रवारी (दि 22 ) रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला ते सायंकाळी चार वाजता शेतात गेले असता त्यांना सर्पदंश झाला होता तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले प्रवीण पाटील हे अतिशय चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात आई , दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.23 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक हजर होते त्यांच्या अकाली मृत्यूमुळे रुईभर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे