लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउद्देशिय सामाजिक संस्था व अमीन सुंबेकर मित्र मंडळ लोहारा यांच्या  वतीने शहरातील गरजु निराधार व विधवा महिलांना अन्नधान्य व जिवनावश्यक किराणाचे 75 किटचे लोहारा तहसिलदार विजय अवधाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कोरोना या रोगाने सर्वांच्या हाताचे काम हिरावुन घेतले आहे तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन  संचारबंदी करण्यात आली, असल्यामुळे गरजुवंतांना  अत्यावश्यक व जिवनावश्यक किराणा किट  देण्यात आले. गोर-गरिब कुटूंबातील अनेकांच्या हाताचे काम सद्या बंद असल्यामुळे  जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या .कुटुंबाचे हातावरचे पोट आहे काम करावे तेंव्हा खाव अशीचे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉक डाऊन असल्यामुळे नागरीक घरामध्येच आहेत.  शहरात अनेक कुटूंबाची बिकट अवस्था असल्याने   गरिबांचे हाल होताहेत यामुळेच संस्थेने मुस्लिम समाजाचा पवित्र महिना असल्याने  जीवनावश्यक साहित्य  वाटप केले .हे वाटप करताना संस्थेने विधवा निराधार व गरजु महिलांची परिस्थिती जाणुन घेत अशा महिलांना या काळात कसल्याही प्रकारचे उपजिवीकेचे साधन नसल्याने ही मदत नसुन कर्तव्य आहे म्हणून हे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकिर,शंकर लोभे [तुळजापुर],दिपक जाधव पोलीस पाटील मोघा,अरुण सुर्यवंशी, लहुजी शक्ती सेना लोहारा तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे, अमीर शेख,महाराष्ट्र ग्रामीण बँक लोहारा  शाखाधिकारी विजय फटके,राहुल सर,जेष्ठ  सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम,सौदागर रोडगे,
युसुफ कुरेशी,महेबुब कुरेशी,सादिक फकिर,मोहसिन कुरेशी उपस्थित होते. या अन्नधान्य व जिवनावश्यक किराणा वाटपाच्या कार्याला आर्थिक मदत करणारे  पुढील दानशुर संस्थेला लाभले शंकर लोभे, मुस्तफा खुटेपड, दिपक जाधव, तानाजी पाटील, गोविंद पाटील, उत्तम पाटील, अमीन सुंबेकर, आलिम बांदार, जाकिर कुरेशी, बाबा कुरेशी, राजेंद्र कदम, विजयकुमार फटके, सलिम कुरेशी, पाशा शेख, अरुण सुर्यवंशी, बळी साळवे, दिपक सुर्यवंशी, अफजल मुजाॕवर, शांतिवीर [आप्पा]जट्टे, सचिन कुलकर्णी, कृष्णा माटे, महादेव धारुळे, हाबीब मोमीन, या सर्व दानशुरांनी संस्थेला आर्थिक मदत केल्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
 
Top