तुळजापूर/प्रतिनिधी-
 कोरोना चा बचावासाठी घाटशिळ पायथ्याशी असणाऱ्या लक्ष्मी पेट्रोलियम येथे ग्राहकांची थर्मल स्कँनिंग करण्यात येवुन त्यांना इंधन दिले जात आहे. येथील सोलापूर- तुळजापूर रस्त्यावर असलेल्या  सिंदफळ येथील भारत पेट्रोलियमच्या लक्ष्मी पेट्रोलियमच्या वतीने ग्राहकांची थर्मल स्कँनिंग ( infrared thermometer) द्वारा तपासणी करण्यात आल्यानंतर इंधन दिले जात आहे
  घाटाच्या पायथ्याशी तुळजापुर -सोलापुर हायवे वरती असलेल्या लक्ष्मी पेट्रोलियमच्या वतीने सर्व नियमित ग्राहकांची infrared thermometer द्वारा तापमान तपासणी करण्यात आली,  लक्ष्मी पेट्रोलियम नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने विचार करुन विविध उपक्रम राबवते  असे श्री सुनिल धुर्वे, आनंद (दादा) कंदले यांनी सांगीतले. तपासणीचा शुभारंभ शुभम पेट्रोलियमचे मालक श्री गोपाळ  देशमुख, वैष्णवी पेट्रोलियमचे व्यवस्थापक  विष्णु म्हात्रे, रविराज साळुंके यांच्या उपस्थिती मध्येे करण्यात आला. यावेळी रमेश कदम, राजाभाऊ नरवडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top