तेर (प्रतिनिधी)
पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य   व कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय तेरच्या वतीने  18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो परंतु यंदाचा हा दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  चार दिवस  विशेष व्याख्यान  आँनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कै.रामलिंग अप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयाचे सहा.अभिरक्षक अमोल गोटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
21 मे रोजी” तेर संग्रहालय व  वाटचाल “ या विषयावर अमोल गोटे यांचे व्याख्यान होणार आहे. 22 मे रोजी वास्तू विशारद इंद्रजीत नागेशकर कोल्हापूर यांचे “तेर संग्रहालय नवीन इमारत वास्तूरचनेची वैशिष्ट्ये” 23 मे रोजी लामतुरे होप्स फांऊंडेशनचे अध्यक्ष रेवणसिध्द लामतुरे यांचे “आठवणी कै.रामलिंगप्पाच्या” या विषयावर व्याख्यान होणार आहे तर  26  मे रोजी पुरातत्व विभागाच्या माजी सहसंचालिका व सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांचे “प्राचीन तगरचा वारसा “या विषयावर आँनलाईन व्याख्यान होणार आहे हे सर्व व्याख्याने ,अमोल गोटे या फेसबुक पेजवर दुपारी 4 ते  5 या वेळेत होणार आहेत .या निमित्ताने प्राचीन तगरवर आधारित आँनलाईन  प्रश्न मंजुषा स्पर्धा ही आयोजित करण्यात आली असल्याचे अमोल गोटे यांनी सांहितले  आहे.

 
Top