उस्मानाबाद /प्रतिनिधी-
जिल्हयात आज नव्याने 6 रूग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने शासकीय यंत्रना सतर्क झाली असुन 6 पैकी उस्मानाबाद शहरातील एक जन असल्याने आज ११ वाजन्याच्या सुमारास शहर बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.मागील काही दिवसापासुन नियमीत सकाळ पासुन दुपारी दोन पर्यंत सुरू असलले शहरातील मार्केट आज आकरा वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर शहरात सन्नाटा पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
ग्रिन झोन मध्ये आसलेला उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाग्रस्तानाची संख्या वाढल्याने जिल्हा रेेड झोन मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. डिचार्ज झालेली तीन रुग्ण धरून जिल्हयातील रुग्णांची संख्या 16 वर पोहचली आहे तर आज 13 रुग्ण उपचार घेत आहेत. रूग्णांचा वाढता आलेख पाहाता शासकीय यंत्रना सतर्क झाली असुन जनतेला वेळोवेळो काळजी घेण्याचे आवाहन  प्रशासनाकडून करण्यात येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून उस्मानाबाद शहर बंद करण्यात आले आहे. त्यानंतर उस्मानाबाद शहरात सर्वत्र सन्नाटा पसरल्याचे   पहावयास मिळाले.

 
Top