उस्मानाबाद / प्रतिनिधी:-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता चार झाली आहे, कांही दिवसापूर्वी सरणवाडी ता. परांडा येथील एकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती, त्याच्यावर परंडा येथे उपचार सुरु असतानाच दि. 14/05/2020 रोजी कळंब तालुक्यातील तीन संशयित रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून तीन पैकी एक कोरोना रुग्ण हा कळंब शहरातील महसूल विभागाचा कर्मचारी असल्याचे कळते, तर कळंब तालुक्यातील पाथर्डी गावातील पती - पत्नी हे मुंबई येथून कांही दिवसापूर्वी आले होते, ते शेतात राहत असल्याची माहिती कळते. दरम्यान पाथर्डी गांव आणि कळंब शहरातील शिवाजीनगर भाग सील करण्यात आला असल्याची माहिती आली आहे. कळंब शहरानजीकच्या सर्व गावातील शासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून हॉट स्पॉट शहरातून गावात येणाराची कसून चौकशी केली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे एकाच दिवशी कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कळंब तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
किराणा दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार असून दवाखाने वैद्यकीय केंद्र व औषध दुकाने सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेली पेट्रोल पंप ,दूध , भाजीपाला , बँका , पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व शासकीय कार्यालय सुरू राहणार असून याव्यतिरिक्त इतर दुकाने 17 मे पर्यंत बंद राहणार आहेत.
 
Top