उस्मानाबाद /प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील हे  गावपातळीवर अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत.मानधन वेळेवर मिळत नसल्याने पोलीस पाटलांचे आतोनात हाल होत असुन इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच ५० लाखाचे विमा कवच मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष हनुमंत देवकते यांनी अशी मागणी केली असुन निवेदनावर दिनकर पाटील,धनंजय गुंड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top