तेर /प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 22 वर्षीय व्यक्तीचा केारोना पाँझीटीव अहवाल आल्याने नागरीकामध्ये घबराहट निर्माण झाली आहे त्यामुळे संपर्कातील 9 नागराकांचे स्वँब घेण्यात आले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुण्याहून आलेल्या 22 वर्षीय  व्यक्तीला ताप व घश्यात खरखर होत असल्याने 24 मे ला तेरच्या ग्रामीण रूग्नालयात तपासणीसाठी आला.  त्याचा  तपासून स्वँब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता.याचा अहवाल 26 मेला पॉझीटीव्ह आल्याने तेरमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.ग्रामीण रूग्नालयातून कोरोना बाधीत व्यक्तीला उस्मानाबाद येथे हलविण्यात आले आहे.    या व्यक्तीच्या संपर्कातील 9 नागरीकांचे स्वँब घेण्यात आले आहेत.याची माहीती मिळताच तहसिलदार गणेश माळी यानी भेट देऊन योग्य सुचना देऊन कारवाईस सुरूवात केली.  आ.राणाजगजितसिंह पाटील यानीही माहीती मिळताच घटनास्थळी भेट देऊन याबाबतीत करावयाच्या उपीययोजनेबाबत सुचना केल्या. रूग्ण ज्या भागात सापडला तो परीसर सिल करण्यात आला आहे.दक्षता म्हणून ढोकी पोलिस स्टेशनचे सपोनि बनसोडे,गिरधावर तिर्थकर,तलाठी श्रीधर माळी,ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे,सरपंच नवनाथ नाईकवाडी,कोरोना कक्ष प्रमुथ गोरोबा पाडूळे.,पोलिस पाटील फातीमा मनियार परीश्रम घेत आहेत.

 
Top